Friday 13 April 2012

कल्पनेतली सफ़र . . .




तिच्या सोबत बोलताना, एक युक्ति आली मनात,
चल म्हणालो फिरून येवू, कल्पनेच्या युगात,

त्या कल्पनेला प्रारंभ झाला, ट्रेकिंगला जायचा बेत आखला,
तिच्या सोबत मी आणि माझ्यासोबत ती, एकमेकांचा मग हात पकडला,

तळपत्या त्या उन्हात, तिच्या प्रेमाची सावली होती,
हळूच आलेल्या वारयाची झुळुक, आमच्या प्रेमाची साक्ष देत होती,

पार करून तो गड, झाडाच्या सावलीला बसलो,
तिच्या मांडीवर डोके ठेवून, फ़क्त तिच्याकडेच पाहत राहिलो,

तिचे सुंदर रूप, मनाला वेड लावत होते,
एकटक तिच्याकडे पाहत, मन कविता करत होते,

असा स्वर्गाहुनही सुंदर क्षण, तिथे आम्ही अनुभवला,
संध्याकाळच्या कोवळया उन्हात, मग परतीचा मार्ग शोधला,

परतीच्या वाटेत थोड़ी, चुकामुक आमची झाली,
साथ सुटली तिची, फ़क्त उरल्या झाडे आणि वेली,

अशी भयंकर ती वेळ, काळजात टोचत होती,
कुठे शोधू मी तिला, अशी आर्त हाक येत होती,

पुन्हा मागे गेल्यावर, ती असल्याची चाहुल मला लागली,
पाहताच तिला त्या क्षणी, वृक्षवल्ली गाऊ लागली,

कल्पनेतही कल्पना करवत नाही, तो काळ इतका भयंकर होता,
विरहात तुझ्या काय सांगू सखे, प्राण माझा दाटला होता,

इथेच थांबवुन कल्पनेची सफ़र, तुझा हात हातात घेतो आहे,
नको सोडू कधी साथ सखे माझी, याचेच वचन मागतो आहे . . .  


- दीपक पारधे

No comments:

Post a Comment