Monday 23 April 2012

प्रेमाच्या शोधात . . .




आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं . . .

कोण असेल ती, कशी असेल ती,
शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात . . .

मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी असते समोर, भिडते नजर थेट,
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो,
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो . . . 

काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम . . . 

पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत . .  .

म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . . 
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू भी कभी अकेला मरता हे"  

- दीपक पारधे 

No comments:

Post a Comment