Saturday 28 April 2012

स्वप्नातले मृगजळ . . .



कोण म्हणते प्रेमामध्ये भाषेची गरज असते,
दोन मनांचे मिलन आणि हृदयाची साथ असते,
रंगभेद, जातीभेद प्रेमामध्ये कधीच बघितला जात नाही,
दोन हृदयांना जोड़णारी फ़क्त भावनेची तार असते . . . 

अशीच एक परी एकदा आली माझ्या जीवनात,
दरी होती फार मोठी, पण काही ओढ़ होती मनात,
घडले कसे हे सारे, जे स्वप्नांप्रमाणे भासत होते,
पण स्वप्नचं जणू सत्यात, उतरू पाहत होते . . . 

आली कल्पना मनात, बघावे तिला विचारून,
असले स्वप्न जरी मृगजळाप्रमाणे, तरी पहावे ते साकारून,
मी बोलण्याची जणू ती वाटच पाहत होती,
असे साकारले माझे स्वप्न, जणू ती माझ्यासाठीच होती . . . 

तो तिचा सहवास आणि ती वेळ करामती होती,
हळू हळू नियतीच्या विरोधात ती नाती गुंफत होती,
आज न उद्या वेगळे होणार, हे दोघांनाही माहीतच होते,
पण असलेला क्षण हा आपलाच, हि त्या प्रेमाची शपथ होती . . . 

आज कितीही लांब असलो तरी ती भावना तशीच आहे,
तिचा तो सहवास आणि तिची ती आठवण तशीच मनात आहे,
असेच हे स्वप्नं होते माझे, जे सत्यात उतरले होते,
काही दिवसांसाठी का असेना, पण ते मृगजळ माझे होते . . . 

- दीपक पारधे  

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्सना जरूर भेट द्या : http://deepakpardhe.blogspot.in/) 

बॉस . . . बोले तो क्यारेक्टर हे ढिला . . .


बॉस . . . बॉस बोले तो confuse character ,
दुध कम with extra water ,

एम्प्लोयीजचा कर्दनकाळ,
काम करायचे आम्ही, पण ह्याच्याच गळ्यात पडते माळ,

साला शादी से पेहले साला बैंड बजाता है,
शादी के बाद साला निंद उडाता है,

क्या बताये इसका फंडा,
आम खाता हे ये, और employee को मिलता हे सिर्फ अंडा,

घुसळ घुसळ घुसळवून साला सगळी वाट लावतो,
प्रमोशनचे गाजर दाखवून, जखमेवरती मीठ चोळतो,

माझाही आहे असाच बॉस, प्रशांत त्याचे नाव,
नावात आहे शांत, बाकी सगळे अशांतीचे गाव,

एम्प्लोयीजना पिडण्यात त्यांना भलतीच मज्जा वाटते,
त्यांचे फंडे आणि त्यांची आयडिया, साला आमचीच वाट लागते,

असा character देवाने बनवला, जसा लाखात एक नमुना,
पूर्ण वाट लावतो आमची आणि बोलतो में हुं ना !!!

काय करावे देवा यांचे, दे यांना अक्कल,
एम्प्लोयीजची वाट लावत पडेल यांना टक्कल,

क्या आदमी बनाया तुने, जिसका सर हे हिला,
में कहू तो साला, ये character हे ढिला . . .  
में कहू तो साला, ये character हे ढिला . . .

- दीपक पारधे 

Wednesday 25 April 2012

आई मला मोठं व्हायचंय गं . . .



झुकवून आभाळ सारं, गगणात नाचायचंय गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

रांगत रांगत पुढे तुझा हात धरला गं,
प्रत्येक पाऊलाला तुझा संस्कार लाभला गं,
कर्तव्याचे फुल तुझ्या चरणी वहायचंय गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

शाळेत शिकताना, तुझे स्वप्नं जाणले गं,
शिकवावे मला खुप, असे तू ठाणले गं,
शिकुन मिळवलेली कला, मला जगाला दाखवायचीयं गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

संकटकाळी माझ्या, फक्त आधार तुझा भेटला गं,
तुझ्या रुपात, देवचं पाठीशी उभा राहिला गं,
न घाबरून प्रसंगाला फक्त पुढेच जायचंय गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

आता नाही थांबणार कुठे, हा निश्चय केलाय गं,
आली संकटे लाख, त्यांना धुळीत मिळवणार गं,
केलेल्या त्यागाचे तुझ्या, मी सार्थक करणार गं,
स्वप्नांना कवेत घेऊन आई मी नक्की मोठा होणार गं . . . 
स्वप्नांना कवेत घेऊन आई मी नक्की मोठा होणार गं . . . 

- दीपक पारधे 

Monday 23 April 2012

प्रेमाच्या शोधात . . .




आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं . . .

कोण असेल ती, कशी असेल ती,
शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात . . .

मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी असते समोर, भिडते नजर थेट,
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो,
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो . . . 

काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम . . . 

पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत . .  .

म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . . 
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू भी कभी अकेला मरता हे"  

- दीपक पारधे 

Sunday 22 April 2012

मी . . . .



'मी' एक उनाड वारा,
पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . .

'मी' एक खळखळणारा झरा,
पण पावसातच वाहणारा . . . 

'मी' एक उत्तुंग श्वास,
पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 

'मी' एक नाजुक भावना, 
पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . .

'मी' जबाबदारीने वेढलेला,
पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 

'मी' एक थकलेले झाड,
पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 

'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन,
पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 

'मी' कोण ? , 'मी' काय ?
पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . 

तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक,
तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला,
कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . .

- दीपक पारधे

Thursday 19 April 2012

ब्रेक अप के बाद . . . .




ब्रेक अप के बाद दिल साला पागल होता हे,
मजनू - मजनू, आशिक़ - आशिक़, दर दर भटकता हे,
आठवणीत तुझ्या क्षण क्षण तडपता हे,
ब्रेक अप के बाद दिल साला पागल होता हे . . . . 

काय सांगावी मनाची व्यथा,
तुजविन सखे अधुरीच माझी कथा,
हर शाम तुझसे मिलने को दिल चाहता हे,
ब्रेक अप के बाद दिल साला पागल होता हे . . . .

ते रोज संध्याकाळचं आपलं भेटणं,
तास न तास बोलून मन मोकळं करणं,
और मुस्कुराके तेरा शरमाना, मुझे आज भी याद आता हे,
ब्रेक अप के बाद दिल साला पागल होता हे . . . .

सागराला साक्षी मानून घेतलेली शपथ आजही मनात आहे,
तुझ्याविना जीवन माझे आजही अधुरेच आहे,
क्या प्यार मे मर के कोई जन्नत पाता हे,
ब्रेक अप के बाद दिल साला पागल होता हे . . . . 

आयुष्यात माझ्या परत येशील का,
तुझ्या प्रीतीची साथ माझ्या हृदयाला देशील का,
तेरे हर पैगाम के लिये, दिल साला आज भी रोता हे,
ब्रेक अप के बाद दिल साला पागल होता हे . . . . 
ब्रेक अप के बाद दिल साला पागल होता हे . . . .

- दीपक पारधे 

Wednesday 18 April 2012

धावती लोकल . . .





धावती लोकल . . .  धावती लोकल . . .  
ठाणे ते सी.एस.टी., सी.एस.टी., ते दादर,
कुर्ल्यावरून वेगळी लाईन, बोलतात त्याला हार्बर,
धावती लोकल . . .  धावती लोकल . . .

कल्याण वरून दोन मार्ग,
एक कर्जत, एक कसारा,
कर्जत ते खोपोली, लागतो गार वारा,
धावती लोकल . . .  धावती लोकल . . .  

सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर,
असे तीन हिचे भाग,
मुंबईच्या कोपरया - कोपरयातुन  धावतो जसा नाग,
धावती लोकल . . .  धावती लोकल . . .  

पहिली ट्रेन इथेच धावली,
याचा आहे मोठा इतिहास,
कुठून पसरली भारतभर, याचा केला का हो अभ्यास,
धावती लोकल . . .  धावती लोकल . . .  

मुंबईची लाफ लान ही,
आहे आमचा श्वास,
बंद पडली की जीव जातो, होतो आम्हाला त्रास,
धावती लोकल . . .  धावती लोकल . . .  

म्हणून म्हणतो बाबांनो, जरा घ्या हिची काळजी, 
म्हणून म्हणतो बाबांनो, जरा घ्या हिची काळजी, 
प्राण पण जाईल, श्वास पण तुटेल जर कराल तुम्ही हलगर्जी,
अशी ही धावती लोकल . . . धावती लोकल . . .

- दीपक पारधे

प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .




प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम,
आजकालच्या युगात लैला मजनूचा गेम,
मित्राची मैत्रिण पण आपला नेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

कॉलेजला जायचं फ़क्त नावचं असतं,
कट्यावर बसणं आमचं कामचं असतं,
भिडली नजर की झाला फेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

प्रेमपत्र आणि कबुतरांचा जमाना गेला,
फेसबुक आणि मॅसेजेसचा जमाना आला,
भेटला नंबर की नाईट पॅक सेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

कुणाची गर्लफ्रेंड कोण कुणाचा बॉयफ्रेंड,
पार्ट टाइम जॉब जसा, मधे स्टोरीचा दी एण्ड,
प्रत्येक वर्षी रिलेशन चेंज हा एकच ऐम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

वाट लागली देवा इथे खरया प्रेमाची,
किंमत नाही कोणाला काही कुणाच्या भावनेची,
कोण सांगेल अर्थ त्यांना, काय असते हे प्रेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .
भिडली नजर त्यांची आणि झाला गेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .


- दीपक पारधे
 

Monday 16 April 2012

माझं बाळ कुठं हरवलं . . .





(माझी ही पुढील कविता माझ्या त्या काही आईंसाठी, ज्या आपल्या मुलाच्या विरहात सतत आठवण काढत बसतात, प्रत्येक मुलगा आई पासून दूर होतो त्याला काही वेगवेगळे कारण असते, तसेच माझ्या पुढील कवितेमधे मी अशा मुलाचा संदर्भ घेतला आहे, जो काही कारणास्तव आई पासून वेगळा झाला आहे.. आणि त्याची आई त्याने कलेल्या कर्मचा हवाला  देत त्याची आठवण काढ़ते आहे. . . आशा करतो तुम्हाला माझी ही कविता आवडेल)


तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं,
आठवणित त्याच्या, माझं काळीज फाटलं . . .

जगासाठी मोठा परी माझ्यासाठी लहानं,
त्याच्या सुखासाठी माझा, जीव हा गहानं,
किती सोसू देवा आता, मन माझं हे तुटलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .

ही काय वेळ आली, तो असा दुरावला,
काळजाचा तुकडा माझ्या, कुठं मावळला,
काय त्याचं नशीब, असं देवानं लिवलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .

नियतीचं घाव त्यानं, एकट्यानं सोसलं,
आमच्या सुखासाठी त्यानं, स्व:ताला मारलं,
काय पांग त्याच्या नशिबाचं असं हे फिटलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .

पण थांबु नकोस बाळा, देव हाय तुझ्या पाठीशी,
झुकवं आभाळ मोठं, तुझ्या पायथ्याशी,
आशीर्वाद माझा फ़क्त तुलाचं मिळलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .

जीव कसा रडतो, तुला काय सांगु बाळा,
अमावसेच्या रातीचा चंद्र पण काळा,
उपकार होतील देवाचे, जर माझं बाळ मला दिसलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . . तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .


- दीपक पारधे

Saturday 14 April 2012

जीवन म्हणजे सागर . . .




जीवन म्हणजे एक सागर, कधी शांत तर कधी वादळ,

कधी नशिबाने भरभरलेली, तर कधी फ़क्त अपेक्षांनी भरलेली घागर,

कुणाच्या सुखाला कधी कोण वाटेकरी, तर कुणा एका बरोबर फ़क्त दु:खाची चादर,

सागराला कित्येक नद्यांची जोड़ मिळते,

काही सोबतच राहतात, तर काहिना नविन वाट फूटते,

कधी उंच लाट बनत स्वप्नांना कवेत घेण्याची हौस असते,

तर कधी ओहोटी बनुन तुटलेल्या स्वप्नांची रास असते,

सागरात इच्छा आकांक्षाच्या बेटांची रीघ असते,

तर ते पूर्ण करण्यासाठी सुरु असलेली शर्यत असते,

या सागरात सगळ्यांना सामावून घेण्याची ताकत असते,

तर कधी कोणाला तारन्याची वा मारण्याची देखिल शक्ति असते,

अशा या सागराला माणुसकीची जोड़ असावी,

स्वत: साठी खारट तर दुसर्यांसाठी नेहमी गोडी असावी,

देवा माझ्या जीवनरूपी सागराला तुझ्या आशिर्वादाची नदी मिळावी,

शरीररूपी या देहामधे इतरांसाठी माणुसकी आणि भावना सतत जिवंत रहावी . . .


-  दीपक पारधे  

Friday 13 April 2012

कल्पनेतली सफ़र . . .




तिच्या सोबत बोलताना, एक युक्ति आली मनात,
चल म्हणालो फिरून येवू, कल्पनेच्या युगात,

त्या कल्पनेला प्रारंभ झाला, ट्रेकिंगला जायचा बेत आखला,
तिच्या सोबत मी आणि माझ्यासोबत ती, एकमेकांचा मग हात पकडला,

तळपत्या त्या उन्हात, तिच्या प्रेमाची सावली होती,
हळूच आलेल्या वारयाची झुळुक, आमच्या प्रेमाची साक्ष देत होती,

पार करून तो गड, झाडाच्या सावलीला बसलो,
तिच्या मांडीवर डोके ठेवून, फ़क्त तिच्याकडेच पाहत राहिलो,

तिचे सुंदर रूप, मनाला वेड लावत होते,
एकटक तिच्याकडे पाहत, मन कविता करत होते,

असा स्वर्गाहुनही सुंदर क्षण, तिथे आम्ही अनुभवला,
संध्याकाळच्या कोवळया उन्हात, मग परतीचा मार्ग शोधला,

परतीच्या वाटेत थोड़ी, चुकामुक आमची झाली,
साथ सुटली तिची, फ़क्त उरल्या झाडे आणि वेली,

अशी भयंकर ती वेळ, काळजात टोचत होती,
कुठे शोधू मी तिला, अशी आर्त हाक येत होती,

पुन्हा मागे गेल्यावर, ती असल्याची चाहुल मला लागली,
पाहताच तिला त्या क्षणी, वृक्षवल्ली गाऊ लागली,

कल्पनेतही कल्पना करवत नाही, तो काळ इतका भयंकर होता,
विरहात तुझ्या काय सांगू सखे, प्राण माझा दाटला होता,

इथेच थांबवुन कल्पनेची सफ़र, तुझा हात हातात घेतो आहे,
नको सोडू कधी साथ सखे माझी, याचेच वचन मागतो आहे . . .  


- दीपक पारधे

तुझ्या प्रीतित . . .




फसलो असा प्रेमामध्ये,
काय गड़बड़ झाली,
कळेना मला काय झाले,
अशी तुझी आठवण आली . . .

तू स्वच्छंदी, तू निरागस,
सुंदर अशी तू ललना,
बोल तुझे इतके नाजुक,
सुमधुर ती भावना . . .

मन वेडे वारयावर फिरले,
प्रीतित तुझ्या नाहले,
ह्या फांदीवुन त्या फुलावर,
पक्षांसमवेत नाचले . . .

घोर जिवाला पडला मग,
कळेल का तुला माझी प्रीति,
न पाहता तुला, हे प्रेम जडले,
हीच प्रेमाची नीती . . .

काय करू कळेना मला,
उपाय सुचेना काही,
कुणीतरी सांगावे तिला,
हे ह्रदय तिचीच वाट पाही . . .  


- दीपक पारधे

Wednesday 11 April 2012

मी मराठा वारस शिवबाचा . . .




मी मराठा, मी मराठा, जगतो, लढतो मराठा,
धुळ चारुनी गनिमास, पुरुनी असा उरतो मराठा,
मायभूमी धन्य ती, जन्मला एक थोर मराठा,
स्वराज्याचे तोरण बांधुन, नडला तो एक मराठा . . .

हिंदवी स्वराज्य तो, तळपतो, तडपतो,
गुलामीची साख तोडून, एक मराठा लढतो,
काय थोरवी गावी त्यांची, मनी प्रश्न दाटतो,
रयतेचा राजा माझा, अजुनही हवासा वाटतो . . .

थोर असा माझा राजा, ख्याती उभ्या जगात,
आजही जिवंत आहे, आमच्या तनात, मनात,
मराठीचा मान त्या मराठ्यानं मिळवला,
झुकवुन असे गनिमास, हिंदवी स्वराज्य घडविला . . .

स्पृश्य आणि अस्पृश्य न भेद तू मानला,
मी रयतेचा आणि रयत माझी, धर्म मराठी आणला,
जाण ठेवून मनी, इतिहास तुझा वाचिला,
गर्वच नाही तर माज मराठी असल्याचा मग वाटला . . .

नमन करत तुला आशि॔वाद मागतो आहे,
मी मराठा, मी मराठा करत फ़क्त मराठी जगतो आहे . . .


- दीपक पारधे

Tuesday 10 April 2012

आजकालचे प्रेम . . .




प्रेम जेव्हा होते, तेव्हा काहीच माहिती नसते,
तो तिचा प्रियकर आणि ती त्याची प्रेयसी असते,

भेटतात कुठल्या वळणावर, मग पटकन नजर भिड़ते,
अगोदर मित्र बनतात आणि नंतर मांजर आडवी जाते,

मग गप्पागोष्टी आणि रुसव्या-फुगव्याचा चालू होतो खेळ,
उठल्यापासून ते झोपेपर्यंत फ़क्त होते विचारांची भेळ,

माहित असते दोघांना, की ते प्रेमात पडले आहेत,
कोण विचारेल अगोदर, पण घोड़े कुठे अडले आहे,

करून थोडीशी हिम्मत, मुलगा बाजीराव पेशवा बनतो,
मनात असुनही थोड़े झुलवत ठेवत त्याला, मस्तानीचा गेम चालू असतो,

शेवटी होकार मिळतो आणि प्रेम प्रकरण चालू होते,
प्रेमाला त्या साक्षी मानून शपथांची यादीच तयार होते,

तू नाही भेटलीस तर मी जिव देईन, असे बाण सुटतात,
तुझ्याशिवाय मी ही अधुरीच, हे ऐकून डायरेक्ट काळजात घुसतात,

हळुहळु सरकत हे प्रेम पुढे जाते,
मग लग्नाची वेळ शोधू पाहते,

जात पडताळणिचा मग, चालू होतो खेळ,
तो नाही माझ्या जातीतला, मग बसेल कसा मेळ,

दुसऱ्याच दिवशी ब्रेक अपचे, फरमान असे निघते,
बाबांना मी वचन दिले आहे, असे कारण असते,

हे ऐकून मुलाला, मोठा धक्काच बसतो,
इंटरवल नंतर मग, देवदास पिक्चर चालू होतो,

काही दिवस तिच्या आठवणीत, तो सतत रडत राहतो,
आता कोण येईल आयुष्यात माझ्या, याचीच वाट पाहतो,

परत कुठल्यातरी वळणावर, त्याला नविन धड़क बसते,
आता हीच माझी प्रेयसी, मग हृदयाची शिट्टी हळूच वाजते,

असे हे आजकालचे प्रेम, काय खोटे नि काय खरे,
कितीही लांब राहण्याचा प्रयत्न केलातरी, बळी पडतातच सारे . . .  


- दीपक पारधे

Monday 9 April 2012

माझी अशी ती मैत्रिण . . .




आज बसलो लिहायला, पण शब्द सुचत नव्हते,
लिहावे काहीतरी नवे, जे तिला हवे होते,

विषय तसा परिचयातलाच  होता, पण मनी तसा भाव उमटत नव्हता,
काय लिहावे त्या वरती, प्रश्न वेड्या मनाला पडला होता,

होती ती पहिली Fan माझी, तिच्यामुळेच कवितेत वाढली होती गोडी,
काय असे लिहू तिच्यासाठी, ज्याने हसू येइल तिच्या ओठावरी,

जेव्हा ती माझ्याशी बोलते, तेव्हा मन माझे जाग्यावर नसते,
त्या नाजुक कोमल आवाजाने, मन माझे उडू लागते,

जेव्हा ती हसते, जणू ताला सुरात ते गीत असे सजते,
ऐकून तिचे हास्य, मग मन माझे डोलते,

आमची अशी ती मैत्री, पण काहीतरी गुपित आहे,
जरी लांब असलो एकमेकांपासून, तरी ती ओढ़ कायम आहे,

जर कधी नाही बोललो थोडावेळ, तर दोघेही कावरे बावरे होतो,
घेवुन पुढाकार मग, एकमेकांस जाब विचारू लागतो,

शेवटपर्यंत ती मैत्री अशीच जिवंत रहावी,
तिच्या प्रतिक्रिये शिवाय, माझी कविता अधुरीच रहावी,

वाट पाहतोय मी, कधीतरी तिला भेटण्याची,
अक्षा सुंदर मैञिणीला, साक्षात् समोरून पाहण्याची . . .

- दीपक पारधे

Sunday 8 April 2012

कॉलेजमधले प्रेम . . .




कॉलेजमधले ते पहिले प्रेम,

अगोदर मैत्रीण नंतर नजर भिडली आणि झाला गेम,

गोड प्रेमळ गप्पांसोबत चालू झाला  प्रवास,

आयुष्याच्या वाटेवरील कायमची सोबती, हाच मनी विश्वास,

ते तिचे नाजुक निरागस हसणं आणि चांदणी सारखं लुकलुकनं,

धुंद वेड्या मनात असं येवून बसनं,

नविन प्रेम म्हंटलकी त्याला काही नविन नाव द्यावं,

ती मला सिन्नु म्हणायची म्हणून मी तिला निहारिका म्हनावं,

अशा सुंदर आणि प्रेमळ प्रवासात घडली एक गम्मत,

कॉलेज बरोबर संपुष्टात आलेले ते प्रेम पाहून तुटली माझी हिम्मत,

आयुष्यभर मित्रचं राहू असा जाताना केला तिने वादा,

तिच्या खुशीतच माझे प्रेम होते, म्हणून मी तिला कारणच नाही विचारले काय कम नी काय ज्यादा,

आज इतक्या वर्षानंतर देखील ती मैत्री जिवंत आहे,

पण तिच्या आठवणित तीळ तीळ मरतो आहे,

त्या वाटेवर मी तसाच तिच्यासोबत मैत्रीचा प्रवास चालतो आहे,

तिचे लग्न झाल्यावर तुटेल हे पण नाते, ह्या विचाराने एकटाच रडतो आहे,

नशिबाने काय खेळ मांडला हे कळलेच नाहिये,

पण कॉलेजात चालु झालेले ते प्रेम आजवर कधी वळलेच नाहीये . . .  


- दीपक पारधे

Saturday 7 April 2012

काळजावर कांदा चिरला . . .




( मित्रांनो, जसे आपण प्रत्येकजन  आपल्या आईला आणि वडीलाना थोर मानतो तसे प्रत्येकाचेच नशीब असते असे नाही, त्यामुळे माझी ही कविता माझ्या त्या मित्रांसाठी ज्यानी वयाच्या अगोदर घराची जबाबदारी सांभालळी पण शेवटी त्यांच्या हातात काहीच नाही उरले.... माझे विचार सर्वानाच पटतील असे नाही पण मी त्यात काही भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तो फ़क्त समजुन घ्याल अशी आशा बाळगतो . . .)


कवितेचे नाव :     काळजावर कांदा चिरला . . .    

उगिवाला दिस कसा घामातं भिजला,
काळजावर कांदा माह्या बापानं चिरला . . .

राब राब राबुन कामातं, मोठं आईनं केलं,
रातीचा दिस अन् दिसाची रात, समदं तिनं सोसलं,
काय पांग फिटलं नशिबाचं, जनम असा म्या घेतला,
काळजावर कांदा माह्या बापानं चिरला . . .

झालो मोठा तवा जवळ काय बी नव्हतं,
सपानं डोळ्यामंदी मोठं, अन् जिव माझं जळतं,
मारून वाघा सारखी उडी, घास हत्तीचा घेतला,
काळजावर कांदा माह्या बापानं चिरला . . .

जबाबदारी पार पाडीत, संसार बहीणींचा वसिवला,
बापाच्या डोक्याचा भार, ऐेसा म्या कम केला,
पण कदर न्हाय ठेवली त्यानं माझी, घात ऐसा हा केला,
काळजावर कांदा माह्या बापानं चिरला . . .

पण आता थांबायचं न्हाय गड्या, जैसा जनम नवा घेतला,
रहायचं उभं परत, जरी कणा माह्या मोडला,
आशीर्वाद राहुदी देवा तुझ्या माह्यावर, खेळ जरी नशिबानं मांडला,
फिकर न्हाय मला त्या बापाची, ज्यानं माह्या काळजावर कांदा चिरला . . .


- दीपक पारधे

Friday 6 April 2012

मी आणि माझे तीन मित्र . . .





तशी नातेवाईकांची कधी मला गरजच नाही भासली,
सुख - दु:ख नेहमी आम्ही एकत्रच वाटली,
दिलीप आणि नितिन तसे बालपणिचे मित्र,
एन तारुण्याईच्या ओघात संदेश ने भर घातली . . .

ते नाते असे घट्ट होते, जशी रेशमाची गाठ,
कधीच फिरवली नाही आम्ही, एकमेकांकडे पाठ,
तसा आपापल्या आयुष्यात, जो तो गुंतलेलाच असायचा,
पण गरज आहे का माझ्या मित्राला, हे जो तो वळुनच पहायचा . . .

दिलीप तसा शांत, पण जसा फौजेतला मेजर,
शिस्त आणि नम्रपणा, नेहमी त्याच्या जिभेवर,
वेळ आली कोणावर, तर नेहमी पुढे धावतो,
बचतीचे गणित माझ्यापुढे नेहमी मांडतो . . .

नितिनची तर काय बाबा, बातच निराळी,
कधी कोणाकडे पाहून त्याने, फूंकलीच नाही शिराळी,
जगण्याचा त्याचा काही फंडाच और आहे,
लेक्चरचे बाण आमचे त्याच्याकडेच वाहे . . .

संदेश सारखा स्वच्छंदी माणुस भेटनारच नाही,
त्याची आईडिया आणि त्याचे फंडे कधी कळलेच नाही,
मनाने असा निर्मळ, जसा वाहता झरा,
माझ्या भावनांसाठी, एक सैफ डिपोसिट बरा . . .

अशी माझी मैत्री आणि असे माझे मित्र,
हृदयात माझ्या आहे त्यांचेच चित्र,
कधी मस्ती, कधी मज्जा, तो प्रत्येक क्षण जिवंत आहे,
माझ्या आयुष्याच्या डायरीत, प्रथम त्यांचेच नाव कोरलेले आहे . . .


- दीपक पारधे

Tuesday 3 April 2012

विरहात तुझ्या . . .




काय सांगू सखे जिव माझा दाटला,
विरहात तुझ्या प्रत्येक क्षण मोठा वाटला . . .

कधी प्रीत ही जडली काही कळलेच नाही,
न सोसावले हे सगळे पापण्या ओलावल्या काही,
न बोलवे आता काय घोळ मनाने घातला,
विरहात तुझ्या प्रत्येक क्षण मोठा वाटला . . .

कळले नाही का असे घडले,
क्षणात असे हे पत्यांचे घर हे कोसळले,
प्रितीचा झुला माझा वारयाने मोडला,
विरहात तुझ्या प्रत्येक क्षण मोठा वाटला . . .

सांग ना काय हे माझे चुकले,
सुखासाठी तुझ्या मी स्व:ताला मारले,
तीर असा हा काळजात घुसला,
विरहात तुझ्या प्रत्येक क्षण मोठा वाटला . . .

छंद तुझ्यामुळे मज लागला होता,
कवितेतून तो बहरला होता,
कोण करेल आता स्तुति माझी, हा प्रश्न मनी पडला,
विरहात तुझ्या प्रत्येक क्षण मोठा वाटला . . .

माफ़ कर मला जर घडली काही चुकी,
न बोलण्याचा तुझ्या, घोर मनाला लागला,
विरहात तुझ्या प्रत्येक क्षण मोठा वाटला . . .


- दीपक पारधे

Monday 2 April 2012

संध्याकाळी कातरवेळी . . .




संध्याकाळी कातरवेळी मज आठवण तुझी येते,
मन पाखरू, होउन गगनात मग अशी भरारी घेते,
उंच ते गगन, चिंब माझे मन, असे वारयावर नाचते,
नभातुन आलेला गार वारा, माझे शब्द होवूनी गाते . . . सखे प्रीत माझी सांगते . . .

ती सांजवेळ, तो प्रेमकाळ, जेव्हा तू अशी अवतरते,
डोळे दिपून जातात माझे, तुझे सौंदर्य असे बहरते,
तेज पाहून तुझे, तो सुर्यही असा झुकतो,
तुला पाहण्यासाठी मग चंद्र कसा हळुहळु वर सरकतो . . . सखे रूप तुझे पाहतो . . .

प्रीतित तुझ्या जिव माझा, कसा वेडापिसा होतो,
प्रत्येक क्षण, गहिवरले मन, फ़क्त साथ तुझी मागतो,
जन्मोजन्मासाठी प्रीत तुझी माझी, अमर होवूनी जावी,
क्षण न असा जीवणात यावा, जेव्हा तुला याद न माझी यावी . . . सखे याद न माझी यावी . . .

स्वप्न हे असे भल्या पहाटे, वेड मनाला लावते,
मन माझे ओले चिंब, मग हळूच रडू पाहते,
होशील का तू कधी माझी, हा प्रश्न मनी दाटतो,
तुझ्या प्रत्येक आठवणी सोबत, मन तुझीच वाट चालतो . . . सखे तुझे प्रेम पाहतो . . .

मी कोण, मी कसा, कधी शोभेल का तुला,
ह्या प्रश्नाचे उत्तर मागतो, सखे जिव हा बावरा . . . सखे जिव हा बावरा . . .


- दीपक पारधे

Sunday 1 April 2012

मैत्री की प्रेम? . . . एक गोड प्रश्न






मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते, अनोळखीशी मैत्री मनात घर करून जाते,

तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो, चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,

मनात विचारांचा चालू असतो खेळ, पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,

त्या नात्याचा गंध काही कळतच नाही, पाउले वेगळ्या दिशेने चालतात पण मन काही वळतच नाही,

दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास, कधी जर नाही काढली तिने आठवण तर होतो त्रास,

त्या नात्यामध्ये अचानक आपलेपण वाढते, सतत मन तिचीच आठवण काढ़ते,

रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे, जसं माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मीच असणे,

मैत्रीच्या नावाखाली हे असचं चालू असतं, कोण विचारेल अगोदर मन वाटचं बघत असतं,

जोड्या स्वर्गात बनतात, त्या अशाच कुठेतरी भेटतात,

कित्येकांचे स्वप्न साकारतात, तर काही पत्यांसारखे कोसळतात,

मी ही आज त्याच वाटेवर चालतोय, माझ्या भावना अशा शब्दात मांडतोय,

कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम, म्हणून तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मागतोय....


- दीपक पारधे  :)

उन्हाळा... गावाला जायची मजा



थंड थंड हिवाळा संपला, गरम गरम उन्हाळा असा पेटला,

आटोपून परीक्षेचा भार, मग गावाला जायचा बेत आखला,

गावाला जायची मजाच वेगळी असायची,

ओसाड रस्ता आणि घनदाट झाडीच दिसायची,

काय काय करायचे तिकडे, हे ठरलेलेच असायचे,

कड़क उन्हात मित्रांच्या जोडीने नुसतेच भटकायचे,

वर्षभरात केलेली मस्ती मग त्याना सांगायची,

आणि नंतर नदीकाठी जाउन मजा लुटायची,

शहरातून आलोय म्हणून वेगळाच रुबाब असायचा,

प्रत्येक खेळामध्ये कसा दबदबा असायचा, 

रात्री जेवणाची वेगळीच असायची मेजवानी,

आणि झोपताना सोबत आजीची गाणी,

सुंदर निसर्गाच्या सानिध्यात गार झोप लागायची,

आणि पहाटेची सुर्यकिरने चटकन डोळ्यावर यायची,

शहरात उशिरापर्यंत झोपनारे तिकडे लवकर उठायचो,

बाबा आणि आजोबांसोबत मग नदीवर आंघोळीला जायचो,

तो सुंदर उन्हाळा आता कुठेतरी हरवलाच आहे,

ह्या दगदगीच्या आयुष्यात जणू कोणीतरी पळवलाच आहे,

आता ऑफिसच्या कामात हे सारे विसरलोच आहे,

म्हणुनच का कुणास ठाउक हा उन्हाळा जास्तच गरम भासतो आहे...


- दीपक पारधे  8) :)