Monday 2 April 2012

संध्याकाळी कातरवेळी . . .




संध्याकाळी कातरवेळी मज आठवण तुझी येते,
मन पाखरू, होउन गगनात मग अशी भरारी घेते,
उंच ते गगन, चिंब माझे मन, असे वारयावर नाचते,
नभातुन आलेला गार वारा, माझे शब्द होवूनी गाते . . . सखे प्रीत माझी सांगते . . .

ती सांजवेळ, तो प्रेमकाळ, जेव्हा तू अशी अवतरते,
डोळे दिपून जातात माझे, तुझे सौंदर्य असे बहरते,
तेज पाहून तुझे, तो सुर्यही असा झुकतो,
तुला पाहण्यासाठी मग चंद्र कसा हळुहळु वर सरकतो . . . सखे रूप तुझे पाहतो . . .

प्रीतित तुझ्या जिव माझा, कसा वेडापिसा होतो,
प्रत्येक क्षण, गहिवरले मन, फ़क्त साथ तुझी मागतो,
जन्मोजन्मासाठी प्रीत तुझी माझी, अमर होवूनी जावी,
क्षण न असा जीवणात यावा, जेव्हा तुला याद न माझी यावी . . . सखे याद न माझी यावी . . .

स्वप्न हे असे भल्या पहाटे, वेड मनाला लावते,
मन माझे ओले चिंब, मग हळूच रडू पाहते,
होशील का तू कधी माझी, हा प्रश्न मनी दाटतो,
तुझ्या प्रत्येक आठवणी सोबत, मन तुझीच वाट चालतो . . . सखे तुझे प्रेम पाहतो . . .

मी कोण, मी कसा, कधी शोभेल का तुला,
ह्या प्रश्नाचे उत्तर मागतो, सखे जिव हा बावरा . . . सखे जिव हा बावरा . . .


- दीपक पारधे

No comments:

Post a Comment