(माझी ही पुढील कविता माझ्या त्या काही आईंसाठी, ज्या आपल्या मुलाच्या विरहात सतत आठवण काढत बसतात, प्रत्येक मुलगा आई पासून दूर होतो त्याला काही वेगवेगळे कारण असते, तसेच माझ्या पुढील कवितेमधे मी अशा मुलाचा संदर्भ घेतला आहे, जो काही कारणास्तव आई पासून वेगळा झाला आहे.. आणि त्याची आई त्याने कलेल्या कर्मचा हवाला देत त्याची आठवण काढ़ते आहे. . . आशा करतो तुम्हाला माझी ही कविता आवडेल)
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं,
आठवणित त्याच्या, माझं काळीज फाटलं . . .
जगासाठी मोठा परी माझ्यासाठी लहानं,
त्याच्या सुखासाठी माझा, जीव हा गहानं,
किती सोसू देवा आता, मन माझं हे तुटलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .
ही काय वेळ आली, तो असा दुरावला,
काळजाचा तुकडा माझ्या, कुठं मावळला,
काय त्याचं नशीब, असं देवानं लिवलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .
नियतीचं घाव त्यानं, एकट्यानं सोसलं,
आमच्या सुखासाठी त्यानं, स्व:ताला मारलं,
काय पांग त्याच्या नशिबाचं असं हे फिटलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .
पण थांबु नकोस बाळा, देव हाय तुझ्या पाठीशी,
झुकवं आभाळ मोठं, तुझ्या पायथ्याशी,
आशीर्वाद माझा फ़क्त तुलाचं मिळलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .
जीव कसा रडतो, तुला काय सांगु बाळा,
अमावसेच्या रातीचा चंद्र पण काळा,
उपकार होतील देवाचे, जर माझं बाळ मला दिसलं,
तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . . तान्हुलं बाळ माझं, आज कुठं हरवलं . . .
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment