Monday, 9 April 2012

माझी अशी ती मैत्रिण . . .




आज बसलो लिहायला, पण शब्द सुचत नव्हते,
लिहावे काहीतरी नवे, जे तिला हवे होते,

विषय तसा परिचयातलाच  होता, पण मनी तसा भाव उमटत नव्हता,
काय लिहावे त्या वरती, प्रश्न वेड्या मनाला पडला होता,

होती ती पहिली Fan माझी, तिच्यामुळेच कवितेत वाढली होती गोडी,
काय असे लिहू तिच्यासाठी, ज्याने हसू येइल तिच्या ओठावरी,

जेव्हा ती माझ्याशी बोलते, तेव्हा मन माझे जाग्यावर नसते,
त्या नाजुक कोमल आवाजाने, मन माझे उडू लागते,

जेव्हा ती हसते, जणू ताला सुरात ते गीत असे सजते,
ऐकून तिचे हास्य, मग मन माझे डोलते,

आमची अशी ती मैत्री, पण काहीतरी गुपित आहे,
जरी लांब असलो एकमेकांपासून, तरी ती ओढ़ कायम आहे,

जर कधी नाही बोललो थोडावेळ, तर दोघेही कावरे बावरे होतो,
घेवुन पुढाकार मग, एकमेकांस जाब विचारू लागतो,

शेवटपर्यंत ती मैत्री अशीच जिवंत रहावी,
तिच्या प्रतिक्रिये शिवाय, माझी कविता अधुरीच रहावी,

वाट पाहतोय मी, कधीतरी तिला भेटण्याची,
अक्षा सुंदर मैञिणीला, साक्षात् समोरून पाहण्याची . . .

- दीपक पारधे

No comments:

Post a Comment