मी मराठा, मी मराठा, जगतो, लढतो मराठा,
धुळ चारुनी गनिमास, पुरुनी असा उरतो मराठा,
मायभूमी धन्य ती, जन्मला एक थोर मराठा,
स्वराज्याचे तोरण बांधुन, नडला तो एक मराठा . . .
हिंदवी स्वराज्य तो, तळपतो, तडपतो,
गुलामीची साख तोडून, एक मराठा लढतो,
काय थोरवी गावी त्यांची, मनी प्रश्न दाटतो,
रयतेचा राजा माझा, अजुनही हवासा वाटतो . . .
थोर असा माझा राजा, ख्याती उभ्या जगात,
आजही जिवंत आहे, आमच्या तनात, मनात,
मराठीचा मान त्या मराठ्यानं मिळवला,
झुकवुन असे गनिमास, हिंदवी स्वराज्य घडविला . . .
स्पृश्य आणि अस्पृश्य न भेद तू मानला,
मी रयतेचा आणि रयत माझी, धर्म मराठी आणला,
जाण ठेवून मनी, इतिहास तुझा वाचिला,
गर्वच नाही तर माज मराठी असल्याचा मग वाटला . . .
नमन करत तुला आशि॔वाद मागतो आहे,
मी मराठा, मी मराठा करत फ़क्त मराठी जगतो आहे . . .
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment