Sunday, 1 April 2012

मैत्री की प्रेम? . . . एक गोड प्रश्न






मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते, अनोळखीशी मैत्री मनात घर करून जाते,

तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो, चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,

मनात विचारांचा चालू असतो खेळ, पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,

त्या नात्याचा गंध काही कळतच नाही, पाउले वेगळ्या दिशेने चालतात पण मन काही वळतच नाही,

दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास, कधी जर नाही काढली तिने आठवण तर होतो त्रास,

त्या नात्यामध्ये अचानक आपलेपण वाढते, सतत मन तिचीच आठवण काढ़ते,

रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे, जसं माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मीच असणे,

मैत्रीच्या नावाखाली हे असचं चालू असतं, कोण विचारेल अगोदर मन वाटचं बघत असतं,

जोड्या स्वर्गात बनतात, त्या अशाच कुठेतरी भेटतात,

कित्येकांचे स्वप्न साकारतात, तर काही पत्यांसारखे कोसळतात,

मी ही आज त्याच वाटेवर चालतोय, माझ्या भावना अशा शब्दात मांडतोय,

कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम, म्हणून तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मागतोय....


- दीपक पारधे  :)

No comments:

Post a Comment