Sunday, 1 April 2012

उन्हाळा... गावाला जायची मजा



थंड थंड हिवाळा संपला, गरम गरम उन्हाळा असा पेटला,

आटोपून परीक्षेचा भार, मग गावाला जायचा बेत आखला,

गावाला जायची मजाच वेगळी असायची,

ओसाड रस्ता आणि घनदाट झाडीच दिसायची,

काय काय करायचे तिकडे, हे ठरलेलेच असायचे,

कड़क उन्हात मित्रांच्या जोडीने नुसतेच भटकायचे,

वर्षभरात केलेली मस्ती मग त्याना सांगायची,

आणि नंतर नदीकाठी जाउन मजा लुटायची,

शहरातून आलोय म्हणून वेगळाच रुबाब असायचा,

प्रत्येक खेळामध्ये कसा दबदबा असायचा, 

रात्री जेवणाची वेगळीच असायची मेजवानी,

आणि झोपताना सोबत आजीची गाणी,

सुंदर निसर्गाच्या सानिध्यात गार झोप लागायची,

आणि पहाटेची सुर्यकिरने चटकन डोळ्यावर यायची,

शहरात उशिरापर्यंत झोपनारे तिकडे लवकर उठायचो,

बाबा आणि आजोबांसोबत मग नदीवर आंघोळीला जायचो,

तो सुंदर उन्हाळा आता कुठेतरी हरवलाच आहे,

ह्या दगदगीच्या आयुष्यात जणू कोणीतरी पळवलाच आहे,

आता ऑफिसच्या कामात हे सारे विसरलोच आहे,

म्हणुनच का कुणास ठाउक हा उन्हाळा जास्तच गरम भासतो आहे...


- दीपक पारधे  8) :)

No comments:

Post a Comment