जीवन म्हणजे एक सागर, कधी शांत तर कधी वादळ,
कधी नशिबाने भरभरलेली, तर कधी फ़क्त अपेक्षांनी भरलेली घागर,
कुणाच्या सुखाला कधी कोण वाटेकरी, तर कुणा एका बरोबर फ़क्त दु:खाची चादर,
सागराला कित्येक नद्यांची जोड़ मिळते,
काही सोबतच राहतात, तर काहिना नविन वाट फूटते,
कधी उंच लाट बनत स्वप्नांना कवेत घेण्याची हौस असते,
तर कधी ओहोटी बनुन तुटलेल्या स्वप्नांची रास असते,
सागरात इच्छा आकांक्षाच्या बेटांची रीघ असते,
तर ते पूर्ण करण्यासाठी सुरु असलेली शर्यत असते,
या सागरात सगळ्यांना सामावून घेण्याची ताकत असते,
तर कधी कोणाला तारन्याची वा मारण्याची देखिल शक्ति असते,
अशा या सागराला माणुसकीची जोड़ असावी,
स्वत: साठी खारट तर दुसर्यांसाठी नेहमी गोडी असावी,
देवा माझ्या जीवनरूपी सागराला तुझ्या आशिर्वादाची नदी मिळावी,
शरीररूपी या देहामधे इतरांसाठी माणुसकी आणि भावना सतत जिवंत रहावी . . .
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment