तशी नातेवाईकांची कधी मला गरजच नाही भासली,
सुख - दु:ख नेहमी आम्ही एकत्रच वाटली,
दिलीप आणि नितिन तसे बालपणिचे मित्र,
एन तारुण्याईच्या ओघात संदेश ने भर घातली . . .
ते नाते असे घट्ट होते, जशी रेशमाची गाठ,
कधीच फिरवली नाही आम्ही, एकमेकांकडे पाठ,
तसा आपापल्या आयुष्यात, जो तो गुंतलेलाच असायचा,
पण गरज आहे का माझ्या मित्राला, हे जो तो वळुनच पहायचा . . .
दिलीप तसा शांत, पण जसा फौजेतला मेजर,
शिस्त आणि नम्रपणा, नेहमी त्याच्या जिभेवर,
वेळ आली कोणावर, तर नेहमी पुढे धावतो,
बचतीचे गणित माझ्यापुढे नेहमी मांडतो . . .
नितिनची तर काय बाबा, बातच निराळी,
कधी कोणाकडे पाहून त्याने, फूंकलीच नाही शिराळी,
जगण्याचा त्याचा काही फंडाच और आहे,
लेक्चरचे बाण आमचे त्याच्याकडेच वाहे . . .
संदेश सारखा स्वच्छंदी माणुस भेटनारच नाही,
त्याची आईडिया आणि त्याचे फंडे कधी कळलेच नाही,
मनाने असा निर्मळ, जसा वाहता झरा,
माझ्या भावनांसाठी, एक सैफ डिपोसिट बरा . . .
अशी माझी मैत्री आणि असे माझे मित्र,
हृदयात माझ्या आहे त्यांचेच चित्र,
कधी मस्ती, कधी मज्जा, तो प्रत्येक क्षण जिवंत आहे,
माझ्या आयुष्याच्या डायरीत, प्रथम त्यांचेच नाव कोरलेले आहे . . .
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment