वादळlत अडकलो मी, थैमान सगळीकड़े उठलेले,
जीव व्याकळुन गेला, प्राण असे सुकलेले....
कळत नव्हते काय घडले, क्षणात मन हे असे का बावरले,
जीव जडला माझा तिच्यावारती, पण रस्ते माझे चुकलेले.....
वाट होती ती अनोळखी, जीव माझा जिच्यावरती,
नाही जुळणार ते नाते, मनात ही गोष्ट सलती......
जगास अपराधी ती, पण परी मात्र मजसाठी,
जीव माझा अडकला असा हा, अन प्राण तिच्या ओठी....
भिन्न होती ती ओढ़, मोठी होती ती दरी,
विसरुनी जावे, काय करावे, प्राण हा तळमळ करी.....
निघुनी जावे दूर तीरावर, ओढ़ नको ही अशी उरावर,
मार्ग न माझा मलाच कळती, जेव्हा न राहूनही पाऊले तिकडेच वळती.....
- दीपक पारधे —
No comments:
Post a Comment