Corruption Corruption हा Corruption चा खेळ,
जनतेची सालं निघाली आणि झाली त्यांची भेळ,
कोण कुठला माणूस साला, एकदा मंत्री झाला,
लुटला त्याने जनतेला, समजुन संत्री आणि केळा... बाबु संत्री आणि केळा...
लोचे सगळे जुने साले, मंत्री नेहमी नवे,
काय झोल, कुठला झोल साला यांचे काय उणे... साला यांचे काय उणे...
पोहच यांची मोठी साला दादा हे इकडचे,
नडला कोणी यांना तर त्याला तिहारचे कड़े... मायला त्याला जेलचे कड़े...
कधी olympic, कधी आदर्श, प्रकरणे यांची मोठी,
नाव त्यांचे मोठे पण, दर्शने ही खोटी... आयला दर्शने ही खोटी....
काय होणार ह्या देशाचे, ज्याला आम्ही मानली माता,
काळीज फाडले आईचे यांनी जाता जाता... देवा यांनी जाता जाता...
शत्रुनीं ठेवली वाकडी नजर, कारण यांचा नव्हता मेळ,
माहित होते त्याना ही नुसती पैशांची भेळ... बाबु नुसती पैशांची भेळ...
काय करावे, कसे करावे, आपलेच ओठ नि आपलेच दात,
श्रीमंतांचे दळते आणि गरीबांचे कुत्रे पीठ खाते, असे म्हणणारी यांची जात...
जगायचे ह्या देशात तर शांत बसून रहा,
गांधीजींची तीन माकडे फ़क्त आठवत रहा... मित्रानो फ़क्त आठवत रहा...
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment