Thursday, 29 March 2012

शिखर....


स्वप्न डोळयात माळुनी, छंद नभात उधळुनी,
मी निघालो त्या वाटेकडे, चंद्र ह्रूदयात साठुनी,

ते लक्ष सितारे सोबती, उंच त्या शिखारावरती,
गाठायचे ते शिखर, श्वास हा रोखुनी.....
संकटे लाख ती, वाट रोखन्यासाठी,
न थामबायचे आता, शिखर गाठन्यासाठी....

रोखून श्वास, जिव हा दाटला,
सर करायचा तो गड, छंद नवा लागला
न थाम्बवे आता, ध्यास तो लागला,
येइल तो दिवस आपला, विश्वास मनी साठला...

अभिवादन त्या सर्वाना, विश्वास ज्यानी दाखवला,
नाही जाऊ देणार तडा त्या विश्वासाला, निश्चयच हा केला.....

विश्वास हा ठेवुणी, निघालो त्या वाटेकडे,
आशीर्वाद असावा आपला, हेच माझे साकडे....... हेच माझे साकडे

- दिपक पारधे

No comments:

Post a Comment