आज एक नविन ओळख झाली,
आणि मनात काहुर माजवुन गेली,
अपेक्षांचे ते डोंगर असे ठाकले,
नविन काही लिहण्याचे वचन मनी दाटले...
नव्या मैत्रीत तिने साद असे गुंफले,
जणू माझ्या गुणांचे गाणे जसे गायले,
ऐकुण तो प्रतिसाद छंद मनाला लागला,
गगनात भरारी घेऊन पक्षी बनुन नाचला...
काय होती ती ओळख नाव नव्हते तिला,
माझ्या चाहत्यांच्या यादीत पाहिले स्थान तिला,
हीच घेऊन उमेद पुढे सरकू लागलो,
काय भेट दयावी तिला विचार करू लागलो...
आवड तिलाही कवितांची, म्हणून ती माझ्या सोबती,
ह्या पेक्षा उत्तम काय असेल भेट, मन हेच सांगती,
म्हणून लिहण्याचा प्रयत्न करतोय आणि भावना माझ्या मांडतोय़,
आवडेल की नाही तिला, थोडा संशय मनी दाटतोय...
अशीच सोबती रहा, मैत्री अमूल्य आहे,
कारण प्रत्येक मैत्रीची किंमत, मला माझ्या कविताहून जास्त आहे...
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment