का कुणास ठाऊक असे होते,
कुणाच्या तरी आठवणित मन वेडे होते...
भानच उरत नाही कुठल्याच गोष्टीचे,
वेड्या मनाला जेव्हा प्रेम होते....
म्हणतात प्रेमाला व्याख्याच नसते,
वेडावलेले मन जाग्यावरच नसते,
ते सतत शोध घेत राहते आपल्या जिवलगाचा,
कुठुनतरी येईल कानोसा त्याचा,
त्याच्याच आठवणित दिवस होतो रात्रीचा,
तास न तास प्रवास चालू होतो आठावनिंचा.....
पण कधीतरी जातोच तडा प्रेमाला,
किंमतच उरत नाही भावनेला,
कुणावर तरी आपण झुरत रहायच,
त्यांनी आपल्याला फ़क्त पाठमोरे फिरवत रहायच,
असाच चालू असतो खेळ......
खरच जीव अगदी वेडापिसा होतो,
जेव्हा भावनांना मिळत नाही किंमत,
म्हणून आता कुणावर प्रेम व्यक्त करण्याची उरलीच नाही हिंमत.....
म्हणून सांगतो मित्रानो.....
फ़क्त हसा आणि हसवत रहा,
ह्या तुटलेल्या हृदयाची भावना कधी कुणाला समजतच नाही,
कारण प्रेमाची खरी व्याख्या कधी कुणाला कळतच नाही..............
- दिपक पारधे
Thanks Chandu...
ReplyDelete