बेधुंद मनाला हा स्पर्श तुझा झाला,
मज वेड अशी तो लावून गेला,
बसले मी एकटीच काढीत तुझी आठवण,
जेव्हा आठवणीतुन तू असा समोर आला..... बेधुंद मनाला हा स्पर्श तुझा झाला,
तो आभास स्वर्गापरी होता,
जेव्हा तू माझ्या मिठीत होता,
प्रेमात पडले मी अशी,
जेव्हा माझा राजकुमार माझ्या सोबत होता....
धुंदीत गात आपण जशी घेतली पावसाची मजा,
मी तुझी अन् तू माझा राजा...
प्रत्येक थेंब पावसाचा मोती बनुन बरसला,
आपली साथ पाहून तो वरुण राजा ही हसला.... बेधुंद मनाला हा स्पर्श तुझा झाला,
रुतु जसे बदलत गेले,
प्रेम तसे बहरून आले,
अशीच राहुदे साथ तुझी सख्या,
सतत बेधुंद मनाला स्पर्श तुझा जसा.... सतत बेधुंद मनाला स्पर्श तुझा जसा...
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment