भेट होती ती अनोळखी, पण ओळख सांगुन जाणारी,
प्रित होती ती साजेशी, हवी हवीशी वाटणारी,
काय नाते होते ते, जे गुपचुप जडले,
अनोळखी असुनही तुने, त्यात रंग भरले.....
वाढत होती ती मैत्री, पण त्यात काही औरच मजा होती,
नकळत काही घडत होते, ती कुणा एकाची सजा होती,
दिवस उलटत गेले, मैत्री वाढत गेली,
नाते बनले ते इतके घट्ट, न सोडायची आता साथ हा एकच हट्ट....
पण प्रत्येक गोष्टीला जसा मध्यांतर असतो,
तसा त्या मैत्रीला ही होता,
जवळ आलेले मित्र असे दुरावतील, असाच तो एक गेम होता,
दिवस गेले अंतर वाढले, जूळलेले हे नाते असे एकदम तानले,
पण ती आठवण अशीच ह्रुदयात होती,
कारण त्या मैत्रीची शपथ अजुनही जिवंत होती.....
पुन्हा भेटले ते एका अशा वळनावर,
मैत्रीची साठवण होती त्या मनावर,
पण मनातील भाव कधी बाहेर आलेच नाही,
बोलूनही काही गोष्टी कधी कळल्याच नाही,
पण मैत्रीची ती हाक सतत जिवंत होती,
कारण मैत्रिमधेच ती अबोल नाती जूळली होती....
आजही ती मैत्री अशीच जिवंत आहे,
माझ्या मैत्रीच्या पुस्तकात सद्देव तिला मोठी किंमत आहे.....
- दिपक पारधे
No comments:
Post a Comment