Friday, 30 March 2012

आठवतेय ती शाळेची घंटा....





घंटा वाजली की मन असे फिरायचे,
जाऊन बसावे परत त्या बाकांवरती असा हट्ट करायचे,
ती वेळ आणि ते वय परत नाही येणार कधी,
मग एकटेच ती खंत करत बसायचे...

आज नाहीये काही अधिक पण बाकी सगळे वजा,
वर्गात केलेली मस्ती आणि बाईंनी दिलेली सजा,
Computer आणि Calculater च्या युगात अगदी विसरलोय पाढयांची मजा,
पाढे पाठ नाही झाले म्हणून कधी घेतलेली रजा...

आज ऑफिसच्या कामातून वेळ पुरतच नाही,
भंडावले डोके काही कळतच नाही,
म्हणून आठवतोय ते शाळेतील खेळ,
कधी कब्बडी, कधी खो-खो आणि शाळे समोरील भेळ...

जेव्हा नसायचे वर्गात लक्ष, पण परीक्षेत मात्र झोप उडायची,
मग एन वेळी मित्राच्या साथीने थोड़ी कॉपी करायची,
होइल यावर पास याची खात्री मात्र असायची,
पण तरीही पालक सभेला दांडी मारायची तयारीच असायची...

शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती,
पण शाळा सुटल्यावर पळायची जरा घाईच असायची,

त्या घंटेचा नाद आजही अगदी कानात घुमतोय,
आज शाळा सूटण्याची नाही तर शाळा भरण्याची वाट पाहतोय,
बाल मित्र आणि जुन्या सवंगडयांसोबत हेच गाणे गातोय,
आठवनींच्या विश्वामध्ये तेच दिवस पाहतोय.... आणि फ़क्त उरलेल्या आठवणी चाफतोय....

- दीपक पारधे

Thursday, 29 March 2012

एक नवी मैत्री....



आज एक नविन ओळख झाली,
आणि मनात काहुर माजवुन गेली,
अपेक्षांचे ते डोंगर असे ठाकले,
नविन काही लिहण्याचे वचन मनी दाटले...

नव्या मैत्रीत तिने साद असे गुंफले,
जणू माझ्या गुणांचे गाणे जसे गायले,
ऐकुण तो प्रतिसाद छंद मनाला लागला,
गगनात भरारी घेऊन पक्षी बनुन नाचला...

काय होती ती ओळख नाव नव्हते तिला,
माझ्या चाहत्यांच्या यादीत पाहिले स्थान तिला,
हीच घेऊन उमेद पुढे सरकू लागलो,
काय भेट दयावी तिला विचार करू लागलो...

आवड तिलाही कवितांची, म्हणून ती माझ्या सोबती,
ह्या पेक्षा उत्तम काय असेल भेट, मन हेच सांगती,
म्हणून लिहण्याचा प्रयत्न करतोय आणि भावना माझ्या मांडतोय़,
आवडेल की नाही तिला, थोडा संशय मनी दाटतोय...

अशीच सोबती रहा, मैत्री अमूल्य आहे,
कारण प्रत्येक मैत्रीची किंमत, मला माझ्या कविताहून जास्त आहे...

- दीपक पारधे

मन बेधुंद .....



बेधुंद मनाला हा स्पर्श तुझा झाला,
मज वेड अशी तो लावून गेला, 
बसले मी एकटीच काढीत तुझी आठवण,
जेव्हा आठवणीतुन तू असा समोर आला..... बेधुंद मनाला हा स्पर्श तुझा झाला,

तो आभास स्वर्गापरी होता,
जेव्हा तू माझ्या मिठीत होता,
प्रेमात पडले मी अशी,
जेव्हा माझा राजकुमार माझ्या सोबत होता....

धुंदीत गात आपण जशी घेतली पावसाची मजा,
मी तुझी अन् तू माझा राजा...
प्रत्येक थेंब पावसाचा मोती बनुन बरसला,
आपली साथ पाहून तो वरुण राजा ही हसला.... बेधुंद मनाला हा स्पर्श तुझा झाला,

रुतु जसे बदलत गेले,
प्रेम तसे बहरून आले,
अशीच राहुदे साथ तुझी सख्या,
सतत बेधुंद मनाला स्पर्श तुझा जसा.... सतत बेधुंद मनाला स्पर्श तुझा जसा...

- दीपक पारधे

Corruption चा खेळ......




Corruption Corruption हा Corruption चा खेळ,
जनतेची सालं निघाली आणि झाली त्यांची भेळ,

कोण कुठला माणूस साला, एकदा मंत्री झाला,
लुटला त्याने जनतेला, समजुन संत्री आणि केळा... बाबु संत्री आणि केळा...

लोचे सगळे जुने साले, मंत्री नेहमी नवे,
काय झोल, कुठला झोल साला यांचे काय उणे... साला यांचे काय उणे...

पोहच यांची मोठी साला दादा हे इकडचे,
नडला कोणी यांना तर त्याला तिहारचे कड़े... मायला त्याला जेलचे कड़े...

कधी olympic, कधी आदर्श, प्रकरणे यांची मोठी,
नाव त्यांचे मोठे पण, दर्शने ही खोटी... आयला दर्शने ही खोटी....

काय होणार ह्या देशाचे, ज्याला आम्ही मानली माता,
काळीज फाडले आईचे यांनी जाता जाता... देवा यांनी जाता जाता...

शत्रुनीं ठेवली वाकडी नजर, कारण यांचा नव्हता मेळ,
माहित होते त्याना ही नुसती पैशांची भेळ... बाबु नुसती पैशांची भेळ...

काय करावे, कसे करावे, आपलेच ओठ नि आपलेच दात,
श्रीमंतांचे दळते आणि गरीबांचे कुत्रे पीठ खाते, असे म्हणणारी यांची जात...

जगायचे ह्या देशात तर शांत बसून रहा,
गांधीजींची तीन माकडे फ़क्त आठवत रहा... मित्रानो फ़क्त आठवत रहा...


- दीपक पारधे

आयटमचा बापूस आयला.....




आयला कैसा लफड़ा झायाला, न पोरीचे बरबर तिचा बापूस आयला,
जावयचे होते मना फिरायला, न pop corn नि burger खायला,
न dhoom बाईकवर बसून, तिच्या बरबर गप्पा मारायला, 
पण आयला कैसा लफडा झायला, न पोरीचे बरबर तिचा बापूस आयला....

न पोरगी अशी item , न दिसायला गोरी,
न पोरगे सगले येरे झाले, मंग परते मला worry ,
न आज नंबर माझा लागला, न पोरीन भेटायचा वादा केला,
पण आयला कैसा लफड़ा झायला, न पोरीचे बरबर तिचा बापूस आयला....

पोरगी होती कवली, न collage ला जाणारी,
लांब लांब केस तिचे, न भुरकन उड़वणारी,
collage ची जान ती, न एकच ती परी,
न मारली तिच्या प्रेमात, मी पण उरी,
पण आयला कैसा लफड़ा झायला, न पोरीचे बरबर तिचा बापूस आयला....

न दिल माझा तुटला, न सगला प्लान फसला,
न काढली होती पिक्चरची टिकिटं, पण खिसा मांजा कापला,
न स्वप्न माझे तुटले, न कालीज असे फाटले,
खिसा होता गरम, पण पैसे नरम वाटले,
आयला कैसा लफडा झायला, न पोरीचे बरबर तिचा बापूस आयला.....

पण घाबराचे नाय गड्या, कारण दूसरा दिवस ठरला,
रीना नाय तर मीना आली, न नविन प्लान रचला,
न नारल फोरतो देवा, न संभाल तिच्या बापाला,
त्याला सांग घरी बसावला, न संभाल तिच्या आईला,
न नको परत लफडा अन नको तिचा बापूस,
न पोरगी पण जायेल न मिलेल हातात हापूस.... न मिलेल हातात हापूस....


- दीपक पारधे

वेडे मन.......


का कुणास ठाऊक असे होते,
कुणाच्या तरी आठवणित मन वेडे होते...
भानच उरत नाही कुठल्याच गोष्टीचे,
वेड्या मनाला जेव्हा प्रेम होते.... 

म्हणतात प्रेमाला व्याख्याच नसते,
वेडावलेले मन जाग्यावरच नसते,
ते सतत शोध घेत राहते आपल्या जिवलगाचा,
कुठुनतरी येईल कानोसा त्याचा,
त्याच्याच आठवणित दिवस होतो रात्रीचा,
तास न तास प्रवास चालू होतो आठावनिंचा.....

पण कधीतरी जातोच तडा प्रेमाला,
किंमतच उरत नाही भावनेला,
कुणावर तरी आपण झुरत रहायच,
त्यांनी आपल्याला फ़क्त पाठमोरे फिरवत रहायच,
असाच चालू असतो खेळ......

खरच जीव अगदी वेडापिसा होतो,
जेव्हा भावनांना मिळत नाही किंमत,
म्हणून आता कुणावर प्रेम व्यक्त करण्याची उरलीच नाही हिंमत.....
म्हणून सांगतो मित्रानो.....
फ़क्त हसा आणि हसवत रहा,
ह्या तुटलेल्या हृदयाची भावना कधी कुणाला समजतच नाही,
कारण प्रेमाची खरी व्याख्या कधी कुणाला कळतच नाही..............

- दिपक पारधे

अशी ती वेळ सुखाची होती........



अशी ती वेळ सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती,
ती माझी अन मी तिचा, हे कानी सांगुन जाती... अशी ती वेळ सुखाची होती......

आनंद तो मज जाहला, शब्दातून मग ओसंडू लागला,
किती बोलावे हे भानच न उरले, तिच्या प्रीतित मी हे जग विसरले,
अशी ती वेळ सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती....

घेवुन तिला मिठीत, बसलो ऐसा अयटीत,
ती एकटीच राणी आणि फ़क्त मीच राजा, असा एक खेळ मांडला,
श्वासातुनी गुंतावुनी श्वास, फ़क्त तिचा आभास, जसा स्वर्ग आम्ही गाठला,
अशी ती वेळ सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती....

काय करावे, किती पहावे, पाहून मग मिठीत घ्यावे,
थोड़े बोलावे, कधी भांडावे, मग सगळे मन मोकळे करावे
अशी ती वेळ सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती....

आज दिवस फिरले होते, माझे प्राण सुटले होते,
मी त्याच किनारयावर होतो, एकांत अनुभवत होतो,
पण ती नाहीये जीवनात, हेच रडगाणे गात होतो,
अशी वेळ निघुनी ती गेली, जसे आयुष्य संपवून गेली,
आता काहीच नाहीये जीवनात, जशी ती वेळ सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती....

येईल का परत ती वेळ, माझी सखी आणि माझा मेळ,
त्याच आठवणी आणि तोच खेळ.....
कारण ती वेळच सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती,
ती माझी अन मी तिचा, हे कानी सांगुन जाती... अशी ती वेळ सुखाची होती......

- दिपक पारधे

शिखर....


स्वप्न डोळयात माळुनी, छंद नभात उधळुनी,
मी निघालो त्या वाटेकडे, चंद्र ह्रूदयात साठुनी,

ते लक्ष सितारे सोबती, उंच त्या शिखारावरती,
गाठायचे ते शिखर, श्वास हा रोखुनी.....
संकटे लाख ती, वाट रोखन्यासाठी,
न थामबायचे आता, शिखर गाठन्यासाठी....

रोखून श्वास, जिव हा दाटला,
सर करायचा तो गड, छंद नवा लागला
न थाम्बवे आता, ध्यास तो लागला,
येइल तो दिवस आपला, विश्वास मनी साठला...

अभिवादन त्या सर्वाना, विश्वास ज्यानी दाखवला,
नाही जाऊ देणार तडा त्या विश्वासाला, निश्चयच हा केला.....

विश्वास हा ठेवुणी, निघालो त्या वाटेकडे,
आशीर्वाद असावा आपला, हेच माझे साकडे....... हेच माझे साकडे

- दिपक पारधे

आता तरी facebook बाबा पावशील का....

जरुर वाचा मित्रानो.... guarantee आहे तुम्हाला नक्की आवडेल....

( मित्रानो माझ्यासारख्या सगळ्या facebook वेड्यांसाठी, माझी एक नविन कलाकारी... खालील गाण्याला चाल लावली आहे " आता तरी देवा मला पावशील का" ह्या गाण्याची... मी आशा करतो की हे गाने तुम्हाला नक्की आवडेल.... आणि आपण मला आपली प्रतिक्रिया देखिल दयाल...)


आता तरी facebook बाबा पावशील का....
पोरिगी मला पटवून... देशील का.... हो हो हो.... आता तरी facebook बाबा पावशील का .....

दिलेस उघडून मला अकाउंट... तरी,
chating मला करायची आहे खरी,
छान छान request मला पाठवशील का..... पोरगी मला पटवून देशील का... हो हो हो...
आता तरी facebook बाबा पावशील का
पोरगी मला पटवून देशील का.....

दिसता नविन मुलगी facebook वरी,
जिव माझा असा हा तळमळ करी,
request accept करायला सांगशील का..... पोरगी मला पटवून देशील का... हो हो हो...
आता तरी facebook बाबा पावशील का
पोरगी मला पटवून देशील का.....

जुने मित्र जरी भेटले.... हरी,
मैत्री त्यांची टिकवायची आहे खरी,
आठवणिना उजाळl तू देशील का..... पोरगी मला पटवून देशील का... हो हो हो...
आता तरी facebook बाबा पावशील का
पोरगी मला पटवून देशील का.....

पटली पोरगी मला facebook वरी,
guarantee नाही तिची ती आहे गोरी,
शेवट पर्यंत साथ द्यायला सांगशील का..... पोरगी मला पटवून देशील का... हो हो हो...
आता तरी facebook बाबा पावशील का
पोरगी मला पटवून देशील का.....

पोरगी मला पटवून देशील का..... हो हो हो... पोरगी मला पटवून देशील का.....

- दीपक पारधे

एक अबोल नाते.......



भेट होती ती अनोळखी, पण ओळख सांगुन जाणारी,
प्रित होती ती साजेशी, हवी हवीशी वाटणारी,
काय नाते होते ते, जे गुपचुप जडले,
अनोळखी असुनही तुने, त्यात रंग भरले.....

वाढत होती ती मैत्री, पण त्यात काही औरच मजा होती,
नकळत काही घडत होते, ती कुणा एकाची सजा होती,
दिवस उलटत गेले, मैत्री वाढत गेली,
नाते बनले ते इतके घट्ट, न सोडायची आता साथ हा एकच हट्ट....

पण प्रत्येक गोष्टीला जसा मध्यांतर असतो,
तसा त्या मैत्रीला ही होता,
जवळ आलेले मित्र असे दुरावतील, असाच तो एक गेम होता,
दिवस गेले अंतर वाढले, जूळलेले हे नाते असे एकदम तानले,
पण ती आठवण अशीच ह्रुदयात होती,
कारण त्या मैत्रीची शपथ अजुनही जिवंत होती.....

पुन्हा भेटले ते एका अशा वळनावर,
मैत्रीची साठवण होती त्या मनावर,
पण मनातील भाव कधी बाहेर आलेच नाही,
बोलूनही काही गोष्टी कधी कळल्याच नाही,
पण मैत्रीची ती हाक सतत जिवंत होती,
कारण मैत्रिमधेच ती अबोल नाती जूळली होती....

आजही ती मैत्री अशीच जिवंत आहे,
माझ्या मैत्रीच्या पुस्तकात सद्देव तिला मोठी किंमत आहे.....

- दिपक पारधे

वादळlतील फुल.....



वादळlत अडकलो मी, थैमान सगळीकड़े उठलेले,
जीव व्याकळुन गेला, प्राण असे सुकलेले.... 

कळत नव्हते काय घडले, क्षणात मन हे असे का बावरले,
जीव जडला माझा तिच्यावारती, पण रस्ते माझे चुकलेले.....

वाट होती ती अनोळखी, जीव माझा जिच्यावरती,
नाही जुळणार ते नाते, मनात ही गोष्ट सलती......

जगास अपराधी ती, पण परी मात्र मजसाठी,
जीव माझा अडकला असा हा, अन प्राण तिच्या ओठी....

भिन्न होती ती ओढ़, मोठी होती ती दरी,
विसरुनी जावे, काय करावे, प्राण हा तळमळ करी.....

निघुनी जावे दूर तीरावर, ओढ़ नको ही अशी उरावर,
मार्ग न माझा मलाच कळती, जेव्हा न राहूनही पाऊले तिकडेच वळती.....


- दीपक पारधे —

प्रेम..... हा सगळा मनाचा खेळ



कधी कधी कळतच नहीं आपण काय करतोय,
नकळत कुणाच्या भावविश्वात असे रमतोय,
वाटते की तो मार्ग आपला नाही,
पण न राहूनही मन तिकडेच वळतय,
काय सांगावे मनाला काहीच सुचत नाही,
काय म्हणावे याला हेच कळत नाही,

प्रित अशी ओढत घेवुन जाते,
साद तिची कानी एकु येते,
नाद असा घुमतो हा तिचा,
मन माझे बहरून जाते,
वेडावलेले मन थांबेल कसे,
तिच्या येण्याची फ़क्त वाट पाहत असे,

असेच होते जेव्हा प्रेम होते,
अनोळखी मन आणि नविन नाते,
हवी हवीशी वाटते ती प्रत्येक आठवण,
फ़क्त तिचे रूप आणि मनातील साठवण,
प्रत्येकाच्या जीवणात ही वेळ येते,
प्रेमामधे जेव्हा मैत्रीची भेळ होते,
प्रेम हा वेड्यामनाचा खेळ असतो,
कुणा एका अनोळखी व्यक्तिशी झालेला मेळ असतो......

- दीपक पारधे

आईचं पिरेम......


आईचं पिरेम म्हणजी आभाळाची माया,

तिच्या विना जगणं म्हणजी व्यर्थ ही काया,

देवही भूका व्हता आईच्या मायेसाठी,

म्हणून त्यानं जनम घेतला अनुसये पोटी,

काय सांगू तिची महती जी जगाला ठावं,

देवानं चमितकार केला आई तीचं नावं,

आज लाख मोठा मी पण ती आईची किमया,

तीनच शिकीवलं मला अ, आ, ई लिव्हाया,

राब राब राबली कामात जावा पैसं नव्हतं पोट भराया,

कष्ट केलं तिनं लयं मला शिकंवाया,

लाख संकट आली पण आधार तिचा व्हतां,

तिच्या रुपात देवच माझ्या पाठीशी व्हतां,

माझं वचन आये तुला न्हाय सोडणार तुझी साथं,

तुझ्या प्रेमासाठी आतुरलेले मन हे गातं,

लय पिरेम दिलसं मला राहू दे तुझी छाया,

तुझ्या मायेसाठी सदा भुकेली ही काया.... सदा भुकेली ही काया.....


- दीपक पारधे