Monday 21 May 2012

लग्न . . . पैशाचा खेळ




असं ते चिमण पाखरू,
जेव्हा होतं अगदी मोठं,
आनंद असतो वेगळाच मनात,
घरच्यांना लग्नाचं पडतं कोढं . . . 

घरातील सरस्वती आपल्या,
लक्ष्मी असते दुसऱ्याची,
लहानपण सुखात घालवून,
झुंज देते लोकांसी . . . 

लग्नाच्या नावाचा खेळ असा मांडतो,
माणुसकीच्या चेहऱ्याआड राक्षस जसा नांदतो,
बाजारात मुलांना विकण्याची हि पद्धतच न्यारी,
सुखी संसारासमोर आता पैसा झाला भारी . . . 

खेळ असा हुंड्याचा चालतो एकदम जोरात,
बैल जसा विकायला काढतात असा तोऱ्यात,
अक्कल जाते मातीत, नि खड्यात जाते शिक्षण,
बायको नको असते यांना, फक्त पैशाचेच आकर्षण . . . 

सोडा आता हि परंपरा,
नि धरा थोडी माणुसकी,
सोडा मोह पैशाचा,
आणि वाढवा गोडी संसाराची . . . 

- दीपक पारधे

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्सना जरूर भेट द्या : http://deepakpardhe.blogspot.in/

No comments:

Post a Comment