Wednesday, 4 July 2012

कुणी आहे का माझ्यासाठी . . .



प्रेमाच्या ह्या दुनियेत, प्रत्येक तीरावर पाखरे दिसतात,
काहींकडे बघून हसू येते, तर काही माझ्याकडे बघून हसतात,
पण कुठेतरी मलाही वाटते की, माझही एक पाखरू असावं,
आणि जेव्हा असेल मी तिच्या खुशीत, तेव्हा तिने मला गोंजरावं,

कुठेतरी दूर आम्ही फिरायला जावं,
फिरून झाल्यावर कुठेतरी निवांत बसावं,
तिच्या गप्पांमध्ये मग हरवून जावं,
आणि एकटक फक्त तिच्याकडेच पाहावं,

माझ्या मनातील भावना, चटकन तिला कळावी,
तिच्या फक्त हसण्याने, एक सुंदर कळी फुलावी,
तिचे सौंदर्य पाहून, जशी चंद्राची चांदणीही लाजावी,
अशी लावण्यखणी माझ्या आयुष्यात यावी,

माझ्या प्रीतीचे पंख मग देईन मी तिला,
भावनांच्या विश्वात घेवून जाईन मी तिला,
प्रेमाच्या झुल्यावर झुलवीन मी तिला,
माझ्या प्रीतीची हवा मग घालीन मी तिला,

अशी कुणी मिळेल का मला प्रेमासाठी,
माझ्या हृदयाशी तार जोडण्यासाठी,
माझ्या वेड्या मनाला समजवण्यासाठी,
तिच्या प्रीतीचा आधार मला देण्यासाठी,
सांगा ना असे कुणी आहे का माझ्यासाठी . . . 
असे कुणी आहे का माझ्यासाठी . . . 

- दीपक पारधे 

No comments:

Post a Comment