विठ्ठल विठ्ठल गजर जाहला, अवघी दुमदुमली पंढरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .
पंढरीच्या देवा तुझी कीर्ती मोठी ठावं रं,
बाळ गोपाळांसंगे नाचे रंक आणि रावं रं,
आलोया तुझ्या भेटीला, मुखात तुझं नावं रं,
प्रीतीच्या ह्या ओघात चाले, उठून सारा गावं रं,
दर्शनास आलो तुझ्या, जरी लांब ती पंढरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .
ज्ञानोबा माउली संत माझा तुकाराम,
नावं तुझे घेता देवा, दिसे मज कृष्ण अन राम,
नामात तुझ्या वेड्या झालो, नसे मज काही काम,
वैकुंठाचे सुख मिळे मज, घेता मुखी तुझे नाम,
कर्माचा या भोग मिळतो, फक्त तुझ्याच दारी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .
आषाढीच्या दिवशी जमे भक्तांचा मेळावा,
दर्शनास तुझ्या येती, मनी मायेचा ओलावा,
वारकरी संप्रदाय, धर्म असा पहावा,
जात धर्म मिसळती हवेत, फक्त प्रीतीचा सांगावा,
जयघोष करीत असे निघालो, काळजी नाही बरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .
चंद्रभागा वाहती अशी जणू प्रेमाचा ओढा,
आंघोळ करिता चंद्रभागेत, मिटे पापाचा घडा,
कर्माची हि रास लागती, माणुसकीचा पाढा,
लहान थोर पीत इथे, तुझ्या
प्रीतीचाच काढा,
मानवतेचा धडा मिळतो, देवा अशी तुझी वारी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .
माणुसकीचा नाश होतोय, पैशाच्या पोटी,
नाते सगळे वाहून जातात, जात यांची खोटी,
गोरगरीबांस सुख मिळो, हि एकची इच्छा माझी,
फक्त आशीर्वाद तुझा राहुदी, होईल कामना माझी पुरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .
विठ्ठल विठ्ठल गजर जाहला, अवघी दुमदुमली पंढरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . . पांडुरंग हरी . . .
पांडुरंग हरी . . . पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .

बोला पंढरीनाथ महाराज कि जय . . .
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment