माझ्या कवितेतली ''ती",
तिच्या ह्रुदयातला "मी",
प्रेमाच्या बंधनात गुंफलो,
माझ्या स्वप्नातली 'ती",
प्रितीचे बोल आज,
तिच्याकडून ऐकले,
शहारले मन,
जणू पाना - फुलांवर डोलले,
मिळताच इशारा तिचा,
सगळे ॠतु कसे बदलले,
लागताच चाहुल प्रेमाची,
मोर पिसारे मग फुलले,
न अजुनही मी तिस पाहिले,
न तिने मज पाहिले,
प्रेमाच्या शपथेसह,
हे मन तिस मी वाहिले,
रहावी प्रीति ही अशी,
जीवनास ती सोबती,
जरी प्रवास हा नवा जसा,
नवी प्रेमसंगती . . . नवी प्रेमसंगती . . .
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment