हे बंध कसे जुळले,
मनास मन हे भिडले,
प्रीतीत तुझ्या मी नाहलो,
मन प्रेम रंगी रंगले . . .
अनोळखी भेट जाहली,
मैत्रीची पालवी फुटली,
ह्या फांदीहून त्या फांदीवर,
फुलपाखरासह नाचली,
हे स्वप्न जसे पडले,
मन प्रेम रंगी रंगले . . .
सुखकर प्रवास जाहला,
मनास मन आवळला,
हृदयात भाव, ओठात बोल,
पण लगाम त्यांसी लागला,
भाव हे मनातच गोठले,
मन प्रेम रंगी रंगले . . .
आता न राहवे मनास,
सोबती हवी जीवनास,
प्रेमाध्याय मांडुनी तिच्यासमोर,
होकार मिळावा त्या प्रेमास,
पण उत्तर न मज मिळले,
मन प्रेम रंगी रंगले . . .
घेवून उडी सागरात,
रोखावा भाव प्रवास,
प्रेम न मिळे प्रत्येकास,
पण जीवास तिचाच ध्यास,
प्रेम प्रश्नरुपी उरले,
मन प्रेम रंगी रंगले . . .मन प्रेम रंगी रंगले . . .
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment