Wednesday, 29 August 2012

असा "मी'' तसा "मी"...


असा "मी'' तसा "मी"
मान हृदयातला "मी"
स्वाभिमान सगळ्यांचा,
तोर्यात फडकतो "मी" . . .

ह्या प्रांतांचा "मी"
त्या देशाचा "मी"
भिन्न भिन्न लोकांच्या,
ओळखीचा चेहरा "मी" . . . 

एका पक्षाचा "मी"
दुसऱ्या संघटनेचा "मी" 
सगळ्या राजकारणात,
ठसा तयांचा उमटवितो असा "मी"

शिवबाचा "मी" 
औरंगजेबाचा "मी"
मराठी स्वराज्य राखतो,
भगव्यात रंगलो "मी" . . . 

भारताचा "मी"
सगळ्यांच्या शिरपेचात "मी"
तीन रंगांची ओळख,
अशोक चक्रासह "मी" . . .

जरी ह्यांचा "मी", जरी त्यांचा "मी"
माणसां - माणसात विखुरलेला, जातीपातीचा "मी"
मानाचा जरी होतो मुजरा मला,
तरीही एका दिवसाचा बादशहा "मी" . . . 

असा "मी" तसा "मी" 
नावाचा झेंडा "मी"
म्हणून स्वराज्याच्या तोरणावर,
सदा फडकतो "मी" . . .

- दीपक पारधे 

No comments:

Post a Comment