Wednesday, 23 May 2012

एक . . . एकटाच




हि सांजवेळ, हा समुद्रकिनारा,
अगदीच मनाला वेड लावतो आहे,
जरी आहे गर्दीत उभा मी,
तरी एक एकटाच भासतो आहे . . .

अशा या अथांग सागरासमोर,
अनेक जोडपी प्रेमगीत गात आहेत,
मी मात्र माझे प्रेमगीत लिहायला,
अजून कोरे पानच शोधत आहे . . .

दृश्य असे हे खुलवत आहे,
वेड मनाला लावत आहे,
प्रेम तीरावर बसून सगळे,
भाव खेळ हा खेळत आहेत . . .

अशी जाणीव आज मनात,
एकच काहूर माजवत आहे,
जणू कोण कोकिळा एका थेंबासाठी,
नुसतेच गाणे गात आहे . . .

गीत असे हे आज मी रचले,
एकटेपणाचे भाव त्यात ओतले,
हळूच त्या मनास समजावले,
प्रेमाविना सगळेच जग थांबले . . .

- दीपक पारधे


माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी join me on facebook  http://www.facebook.com/deepak.pardhe.5

No comments:

Post a Comment