Friday, 18 May 2012

बंधनातील प्रेम . . .


प्रेम कधी सांगून किंवा पाहून होते असे नाही,
ज्या हृदयाशी गाठ बसते, ते आपलेच असते असे नाही,
ती आपली होणारच नाही, ह्या भीतीचे वादळ मनात फिरतच असते,
तिच्या सहवासातून दूर निघून जावे कि नाही तिथेच मन फसते . . . 

जेव्हा विचार मनात तिचा येतो, तेव्हा मन बावरून जाते,
येईल का माझ्या मागे ती कधी, हे सतत मन वळून पाहते,
पण मनाला दिलासा देण्यासाठी, फक्त तिची आठवणच असते,
काय होईल प्रेमाचे माझ्या, कारण ओठांत आणि मनात तीच असते . . . 

कधी कधी वाटते, तिला मनातले सगळे सांगून टाकावे,
असलेले प्रेम माझे, जणू तिच्या हृदयात ओतून पहावे,
जर होकार मिळाला, तर हृदयाला होणारा त्रास तितकाच असेल,
आणि नकार असेल, तर हृदय माझे तिथेच जळावे . . . 

का असे प्रेम होते, ज्याला सगळीकडून बंधनेच असतात,
दमट, कोरड्या हवेमध्ये, ढग जसे दाटतात,
जरी नाही मिळाली मला साथ तिची, पण तिला मात्र माझे प्रेम कळावे,
एक बंधनरुपी मुर्तीम्हणून, तिच्या हृदयात कायमचे मलाच स्थान मिळावे . . .  

- दीपक पारधे 

No comments:

Post a Comment