Thursday, 24 May 2012

कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .



(मित्रांनो माझी पुढील कविता अथवा गाणं हे "श्री. व्ही. शांताराम" यांच्या "पिंजरा" या चित्रपटातील "कशी नशिबानं थट्टा आज मांडली" ह्या गाण्यावर साकारले आहे, हे असे लिहिण्याचा माझा उद्देश एकच आहे कि, चालू असलेल्या असलेल्या भ्रष्टं कारभाराने आपण त्रस्त झालो आहोत आणि यातून तीच व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे, मी आशा करतो तुम्हाला माझ्या इतर कवितांसारख्या हि देखील आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला मिळतील) 

नाव : कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

दहा दिशांनी, दहा रावणांनी, मांडला तमाशा हो,
अत्याचारात दबली जनता, तुम्ही एका हो . . . 

आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

गंगेमुळं निर्मळ होता असा एक देश . . . असा एक देश . . .
भिन्न इथल्या भाषा आणि भिन्न त्यांचे वेश . . . भिन्न त्यांचे वेश . . . 
त्यांच्या सुखी संसाराची, वाट लावली . . . 
कशी . . . सरकारनं हि थट्टा आज मांडली . . . 
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

अश्या देशी कित्येक होते थोर मोठे पंत . . . थोर मोठे पंत . . . 
पुण्यवान होती भूमी, जन्मले ते संत . . . जन्मले ते संत . . .
त्यांना भुक्या लांडग्यांची द्रुष्ट लागली . . . 
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

भस्मासुर माजला इथं, महागाई झाली . . . महागाई झाली . . .
जगणं अगदी मुश्कील झालं, अशी वेळ आली . . . अशी वेळ आली . . .
कशी गरिबांवर ठिणगी आज पडली . . . 
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

भ्रष्टाचारी प्रवृत्तीनं, थयथायट केला . . . थयथायट केला . . .
राजकारणासाठी हो माणूस वेडा झाला . . . माणूस वेडा झाला . . . 
त्यांनी गाठ माणुसकीची कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

टगेगिरी वाढली यांची, असे हे राव . . . असे हे राव . . .
जात धर्म नाही यांना, पैशाचे नाव . . . पैशाचे नाव . . .
त्यांनी गरिबांची नाळ कशी तोडली,
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

सामान्यांस कळला नाही, खोटा ह्यांचा खेळ . . . खोटा ह्यांचा खेळ . . .
बाजारात लुटला गेला, त्याचा जाई तोल . .  त्याचा जाई तोल . . .
त्याला कुत्र्या मांजराची दशा आणली . . . 
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

आमचा देह, आमचा डोळा, आमचे मरण . . . आमचे मरण . . . 
ह्यांनी असे रचिले देवा, आमचे सरण . . . आमचे सरण . . . 
आमच्या फुटक्या कर्माची हि यात्रा भरली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
 
- दीपक पारधे 

Wednesday, 23 May 2012

एक . . . एकटाच




हि सांजवेळ, हा समुद्रकिनारा,
अगदीच मनाला वेड लावतो आहे,
जरी आहे गर्दीत उभा मी,
तरी एक एकटाच भासतो आहे . . .

अशा या अथांग सागरासमोर,
अनेक जोडपी प्रेमगीत गात आहेत,
मी मात्र माझे प्रेमगीत लिहायला,
अजून कोरे पानच शोधत आहे . . .

दृश्य असे हे खुलवत आहे,
वेड मनाला लावत आहे,
प्रेम तीरावर बसून सगळे,
भाव खेळ हा खेळत आहेत . . .

अशी जाणीव आज मनात,
एकच काहूर माजवत आहे,
जणू कोण कोकिळा एका थेंबासाठी,
नुसतेच गाणे गात आहे . . .

गीत असे हे आज मी रचले,
एकटेपणाचे भाव त्यात ओतले,
हळूच त्या मनास समजावले,
प्रेमाविना सगळेच जग थांबले . . .

- दीपक पारधे


माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी join me on facebook  http://www.facebook.com/deepak.pardhe.5

Monday, 21 May 2012

लग्न . . . पैशाचा खेळ




असं ते चिमण पाखरू,
जेव्हा होतं अगदी मोठं,
आनंद असतो वेगळाच मनात,
घरच्यांना लग्नाचं पडतं कोढं . . . 

घरातील सरस्वती आपल्या,
लक्ष्मी असते दुसऱ्याची,
लहानपण सुखात घालवून,
झुंज देते लोकांसी . . . 

लग्नाच्या नावाचा खेळ असा मांडतो,
माणुसकीच्या चेहऱ्याआड राक्षस जसा नांदतो,
बाजारात मुलांना विकण्याची हि पद्धतच न्यारी,
सुखी संसारासमोर आता पैसा झाला भारी . . . 

खेळ असा हुंड्याचा चालतो एकदम जोरात,
बैल जसा विकायला काढतात असा तोऱ्यात,
अक्कल जाते मातीत, नि खड्यात जाते शिक्षण,
बायको नको असते यांना, फक्त पैशाचेच आकर्षण . . . 

सोडा आता हि परंपरा,
नि धरा थोडी माणुसकी,
सोडा मोह पैशाचा,
आणि वाढवा गोडी संसाराची . . . 

- दीपक पारधे

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्सना जरूर भेट द्या : http://deepakpardhe.blogspot.in/

Friday, 18 May 2012

बंधनातील प्रेम . . .


प्रेम कधी सांगून किंवा पाहून होते असे नाही,
ज्या हृदयाशी गाठ बसते, ते आपलेच असते असे नाही,
ती आपली होणारच नाही, ह्या भीतीचे वादळ मनात फिरतच असते,
तिच्या सहवासातून दूर निघून जावे कि नाही तिथेच मन फसते . . . 

जेव्हा विचार मनात तिचा येतो, तेव्हा मन बावरून जाते,
येईल का माझ्या मागे ती कधी, हे सतत मन वळून पाहते,
पण मनाला दिलासा देण्यासाठी, फक्त तिची आठवणच असते,
काय होईल प्रेमाचे माझ्या, कारण ओठांत आणि मनात तीच असते . . . 

कधी कधी वाटते, तिला मनातले सगळे सांगून टाकावे,
असलेले प्रेम माझे, जणू तिच्या हृदयात ओतून पहावे,
जर होकार मिळाला, तर हृदयाला होणारा त्रास तितकाच असेल,
आणि नकार असेल, तर हृदय माझे तिथेच जळावे . . . 

का असे प्रेम होते, ज्याला सगळीकडून बंधनेच असतात,
दमट, कोरड्या हवेमध्ये, ढग जसे दाटतात,
जरी नाही मिळाली मला साथ तिची, पण तिला मात्र माझे प्रेम कळावे,
एक बंधनरुपी मुर्तीम्हणून, तिच्या हृदयात कायमचे मलाच स्थान मिळावे . . .  

- दीपक पारधे 

Friday, 11 May 2012

ती . . . जिच्याविना सगळे अधुरेच



(माझी हि खालील कविता माझ्याकडून माझ्या देशासाठी आणि समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून लिहिलेली आहे खरेतर रविवार, दि. ० ६ / ०५ / २०१२ रोजी "आमीर खान" यांचा "सत्यमेव जयते" हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आपणही आपल्या पद्धतीने काहीतरी करायला हवे ह्या प्रेरणेतून सगळे सुचले आहे, मी अशा करतो मी खालील कवितेत व्यक्त केलेल्या भावना तुम्हा सर्वांना आवडतील आणि त्यातून तो संदेश पुढे सरकत राहील . . . त्यामुळे जेवढे जमेल तेवढा हा संदेश पुढे पुढे पाठवा...)  

कवितेचे नाव :  ती . . . जिच्याविना सगळे अधुरेच

नाही चालणार हे जग,
ह्या जगाचा आधार तिचं,
चमत्कार हा देवाने केला,
ह्या विश्वाचा स्त्रोत तिचं . . . 

तिच्यामुळेच पूर्ण होतो,
तो राजा आणि तो रंक,
तिच्याविना सगळे अधुरेच,
काही मोजण्याइतकेच अंक . . . 

तिचं आई, तिचं मुलगी,
तिचं जीवनाची साथीदार,
जर संपली तिची उत्पती,
तर मिळेल का हो आधार . . . 

वंशाचा दिवा पेटण्यासाठी,
वातं तिचं असते,
दिवा पेटतो आणि प्रकाशमय होते सगळे,
पण ती वात तशीच जळत असते . . . 

इतके महत्व तिचे,
कोण समजेल का कधी,
मुलगी म्हणजे लक्ष्मी म्हणतो आपण,
तरी वाढ खुंटते तिचीच . . . 

सगळे मिळूनी आता,
ह्या जगास द्या एकाच नारा,
थांबवा मुलींची हत्या,
कारण तिच्याविना सगळा कोरडाच वारा . . . 
तिच्याविना सगळा कोरडाच वारा . . . 

- दीपक पारधे 


Monday, 7 May 2012

नाते अनोळखी . . .





काही असतात अशा आठवणी, ज्या मनात वसुनी राहतात,
कोण कुठली माणसे काही, आपलीशी मग वाटतात,
असेच नाते माझे जुडले, होते जे अनोळखी,
वेगवेगळे जरी किनारे, पण ती लाट माणुसकीची . . .

असा वेगळा प्रवास झाला, त्या पैलतीरावर जावून थांबला,
भाषा वेगळी प्रांत हा भिन्न, कसे जमेल हा प्रश्न दाटला,
गाठ भेट ती अशी जाहली, नव मायेची फुंकर लाभली,
अनोळखी त्या नात्यामध्ये, वेगळीच मग गोडी वाढली . . .

लग्नाचा तो योग होता, कार्य असे तिथे घडत होते,
त्या क्षणांचा आनंद घेत, मन पाखरू होवून गात होते,
अशी पाखरे त्या फांदीवर, खेळ सुखाचा खेळत होते,
काय थोर नि काय लहान, प्रेमात सगळे गुंफले होते . . .

असा विरघळलो रंगात त्यांच्या, जसा मी हि एक पाखरू,
क्षणांत मने जिंकून घेईल, अशा गायीचं मी वासरू,
एक विनंती करतो देवा, असा हास्यरंग वसू दे,
तुटून सगळी दुखाची गाठ, एक प्रेम गाठ बसू दे . . .

असा क्षण हा जीवनात आला, जो कधी न मी विसरणार,
असाच फिरत प्रत्येक तीरावर नाती मी जोडणार . . . अशीच नाती मी जपणार . . .


- दीपक पारधे

हमारी दोस्ती . . .



तेरी मेरी दोस्ती यारा जमानेने मानी,
तू जिथे तिथे मी यारा, हीच आपली यारी,
काय म्हणावे यारीला या, दोघेही मस्त कलंदर,
छोड़ दो यारो टेंशन वेंशन, रोते हे सिर्फ बंदर,
यारो हम यहाँ के सिकंदर . . . यारो हम यहाँ के सिकंदर . . . 

दोस्ती तेरी धासु यारा, जान तेरे पे लुटाऊ,
आये कोई आफत तुझपे, तो में मर जाऊ . . . साला यम को मिलके आऊ,
मैत्री ही आपली छान दोस्ता, क्या बाहर क्या अंदर,
प्रत्येक क्षण आपलाच यारा, जीवन हे अति सुंदर,
यारो हम यहाँ के सिकंदर . . . यारो हम यहाँ के सिकंदर . . . 

हरपल तेरा साथ था यारा, जब भी था कुछ गम,
हसती खेलती यादो में भी, कभी ना था कुछ कम,
ऐसी ही रहे दोस्ती हमारी, और बने दोस्ताना,
बस गुल खिलेंगे हर जगह, और देखेगा ये जमाना,
यारो हम यहाँ के सिकंदर . . . यारो हम यहाँ के सिकंदर . . . 

न बिछड़ेंगे कभी जिंदगी में, खाते हे ये कसम,
आ मिल जा गले यारा, तू जान हे मेरी सनम,
क्लिअर हे अपना फंडा यारा, गम झेलते हे सिर्फ बंदर,
मजमे रहो और खुल के जियो, जीवन हे अति सुंदर,
यारो हम यहाँ के सिकंदर . . . यारो हम यहाँ के सिकंदर . . . 
यारो हम यहाँ के सिकंदर . . . यारो हम यहाँ के सिकंदर . . .


- दीपक पारधे