Tuesday, 11 December 2012

पोलीस . . .



२६/११ ची आठवण,
अजूनही मनात जिवंत आहे,
आतंकवादयांशी लढता लढता,
पोलिसांचे रक्त सांडले आहे . . .

अश्या त्या भेडुक हल्याचा,
तो कट मोठा होता,
आतून पोखरलेल्या समाज्याचा,
एक गट त्यात होता . . .

मागून हल्ला करण्याची,
हि गनिमांची रीत जुनीच आहे,
असावध झोपलेल्या वाघांना मृत्यू,
आणि सावध मंत्र्यांना सुखद झोप आहे , , ,

तरीही त्यांना रोखण्यास,
आमचा पोलीस समर्थ होता,
कसाबला जिवंत पकडायला,
फक्त हवालदार ओंबळे होता . . .

पोलिसांच्या डोक्यावर जरी वाघ असला,
तरी हाताला दोरीचे बंध आहेत,
दोरी ताणून नाचवायला,
भ्रष्ट पुढारी आणि मंत्री आहेत . . .

अश्या त्या निडर पोलिसांना,
असते का स्वतःचे अस्तित्व,
मेल्यानंतर श्रद्धांजली देण्यापेक्षा,
त्याआधी सेल्युट करतंय माझं कवित्व . . .

- दीपक पारधे

No comments:

Post a Comment