काय व्यवहार हा केला,
जग पाठी सोडियला,
धन पैसा कमवूनी,
दोन नाती विसरला . . .
ज्या हातात वाढला,
बाळ पाळण्यात निजला,
अंगाईविना झोप,
का कधी लागलीया तुला . . .
एक छोटंसं खुराडं,
कशी व्हहिल रं तुझी वाढ,
ह्या चिंतेनं खचून,
पार खुटलं ते झाड . . .
मोठं करुनीया तुला,
घास सोन्याचा भरविला,
थाटून संसार तुझा,
जो फाटक्या झोळीसः परतीला . . .
ह्यो आई - बापाचा त्याग,
कधी कळला का तुला,
लाख देव देव करून,
तू खऱ्या देवास मुकला . . .
नको इसरूस त्यांना,
जे मेलं तुह्यासाठी,
आई - बापाच्याच रुपात,
असतो देव आपल्यापाठी . . .
आई - बापाची हि माया,
त्या ढगाहुन ही मोठी,
काही शब्दात मांडीतो,
माहे भाव त्यांच्यासाठी . . .
आई - बापाचं हे नातं,
सर्व जगी मोठं बाळा,
त्यांच्या मायेविना सदा,
सुका राहील ह्यो झोळा . . .
सुका राहील ह्यो झोळा . . .
- दीपक पारधे
No comments:
Post a Comment