Saturday, 27 October 2012

आई - बाप . . .


काय व्यवहार हा केला,
जग पाठी सोडियला,
धन पैसा कमवूनी,
दोन नाती विसरला . . . 

ज्या हातात वाढला,
बाळ पाळण्यात निजला,
अंगाईविना झोप,
का कधी लागलीया तुला . . . 

एक छोटंसं खुराडं,
कशी व्हहिल रं तुझी वाढ,
ह्या चिंतेनं खचून,
पार खुटलं ते झाड . . .  

मोठं करुनीया तुला,
घास सोन्याचा भरविला,
थाटून संसार तुझा,
जो फाटक्या झोळीसः परतीला . . .

ह्यो आई - बापाचा त्याग,
कधी कळला का तुला,
लाख देव देव करून,
तू खऱ्या देवास मुकला . . . 

नको इसरूस त्यांना,
जे मेलं तुह्यासाठी,
आई - बापाच्याच रुपात,
असतो देव आपल्यापाठी . . . 

आई - बापाची हि माया,
त्या ढगाहुन ही मोठी,
काही शब्दात मांडीतो,
माहे भाव त्यांच्यासाठी . . .

आई - बापाचं हे नातं,
सर्व जगी मोठं बाळा,
त्यांच्या मायेविना सदा,
सुका राहील ह्यो झोळा . . . 
सुका राहील ह्यो झोळा . . .

- दीपक पारधे 

Thursday, 4 October 2012

बंध . . .


भांडणांच्या गोष्टी . . .


परतीचा प्रवास . . .


जाड्या . . .


मेरा भारत महान !!!


सुख हास्य . . .



(हि कविता एका अश्या विषयावर केली आहे ज्याविना सगळ्यांचे जीवन अधुरेच असते आणि ते म्हणजे सुख . . . तुम्हीच विचार करा तुमच्याकडे पैसा आहे, खूप संपत्ती आहे पण जर सुख नाहीये तर त्या पैश्याचा आणि संपत्तीचा काही फायदा होईल का ? नाही ना... कारण खरच पैश्याने सर्व काही खरेदी करता येतेच असे नाही. सुख म्हणजे काय कधी कधी तर सुखाची व्याख्या हि कळत नाही, मला काही हाच प्रश्न पडलाय आणि त्यावरच विचार करून काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय, पहा तुम्हालाही सापडताय का यातून उत्तर . . .  मला नक्की सांगा तुम्हाला काय उमजले ह्यातून . . . धन्यवाद !!!  )

न मिळे हे त्यास,
खरे हवे  हे ज्यास,
व्याख्या हि मनाची,
व्याख्या हि सुखाची . . . 

मनास न कळती,
तरीही मनास हे बोचती,
टाकुनी सर्व मागे,
फक्त सुखाखातर भागती . . .

न पैश्याचे मौल ह्यास,
न धनाचे तौल ह्यास,
न मिळती हे बाजारात,
न लाभे हे वाण्यास . . . 

म्हणाले संत रामदास,
विचार तू मनास,
जगी न सुखी कोण,
शोधूनी ह्या जगास . . .

न तुलना ह्यास कशाची,
गोडी ह्यात मधाची,
घनदाट जंगलामधुनी,
मिळावी वाट सुखाची . . .

काय करावे मग,
प्रश्न करी मनास,
जोड फक्त माणूस,
पात्र होशील सुखास . . .

म्हणोनी झटकून हा व्देष,
म्हणोनी झटकून हा राग,
माणसास माणूस जोडूनी,
उमलावे सुख हास्य . . .
उमलावे सुख हास्य . . . 

- दीपक पारधे