आली वर्षांची दिवाळी,
संगे लाडू - शंकरपाळी,
ढीग फराळ सजला,
उडे फटाक्यांच्या माळी,
दारी दिवे हे सजले,
तोरण - कंदील ते लागले,
सण असा चैतन्याचा,
घरी लक्ष्मीस पुजले,
मन आनंदी बहरले,
नात्यांसह गहिवरले,
मित्र सोबती आप्तेष्ट,
चांदणे शिंपित ते फिरले,
ऋतू असा बहरावा,
मने गुंफून ती यावी,
जरी छीद्राचीओंजळ ओंजळ,
पण प्रेमाने वाहावी,
अशी सुखाची दिवाळी,
भरो समृद्धीची झोळी,
आलो शुभेच्या घेवून,
देत भल्या पहाटेची आरोळी
अशी आली वर्षाची दिवाळी
- दीपक पारधे
(माझ्या तमाम श्रोत्यांना माझ्याकडून माझ्या कवितेच्या रुपात दिवाळीची भेट, हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुख - समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.... शुभ दीपावली)